‘नाईक कसलेले पहेलवान, त्यामुळे तेच जिंकणार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 10:52 IST2025-10-18T10:51:54+5:302025-10-18T10:52:19+5:30
शिवसेनेतील अनेक महिला आजही पक्षाशी एकनिष्ठ आहेत. ज्या गेल्या त्या लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदेने पगारी मतदार निर्माण केले होते. पगार द्या आणि मत घ्या. त्यापेक्षा आम्हाला रोजगार निर्माण करून द्या, असे स्वाभिमानाने सांगायला हवे होते, असे त्यांनी सांगितले.

‘नाईक कसलेले पहेलवान, त्यामुळे तेच जिंकणार’
पालघर : गणेश नाईक हे कसलेले पहेलवान आहेत त्यामुळे ठाणे आणि पालघरमध्ये वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वरच्यावर सुरू असलेल्या वादाच्या लढाईत अंतिम विजय हा गणेश नाईक यांचाच होणार आहे. त्यांनी पक्ष सोडले असतील; पण कधी संयम सोडला नसल्याचे उद्धवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पालघर येथे केले.
पालघर येथे शिवसेना जिल्हा मध्यवर्ती शिवसेना पक्षाचे कार्यालय आणि सफाळे माकणे येथे शाखेचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी संपर्कमंत्री विकास पोतनीस, अमोल कीर्तीकर, उत्तम पिंपळे, डॉ. विश्वास वळवी, जिल्हाप्रमुख अजय ठाकूर, गिरीश राऊत, अनुप पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रॉकी तांडेल, सहसंपर्क विकास मोरे, जयेंद्र दुबळा आदी उपस्थित होते. पालघरला आज आमदार नाही, पण उद्या असेल. हे चोऱ्या करून निवडून आलेत. मतदार यादीतले घोटाळे करून हे निवडून आले असून, सांगलीमध्ये एका घरात ९० मतदार असलेले ४२ वर्षांची १४ मुलांची करण्यात आलेली नोंद बघून ही सर्व मुले एकाच दिवशी जन्माला आली की काय? असा प्रश्न उपस्थित केला.
लोकलने गाठले सफाळे
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दररोजच वाहतूककोंडी होत असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री गणेश नाईक यांनाही वाहतुकीचा फटका बसला. त्यामुळे विरार-सफाळे रोरो सेवेने प्रवास करून पालघर गाठले होते.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी वाहतूक कोंडीची परिस्थिती ओळखून शुक्रवारी बोरिवली ते सफाळेदरम्यान लोकलने प्रवास करीत सकाळी साडेअकरा वाजता सफाळे रेल्वेस्थानकात दाखल झाले.
‘त्या’ बहिणी पगारी मतदार
शिवसेनेतील अनेक महिला आजही पक्षाशी एकनिष्ठ आहेत. ज्या गेल्या त्या लाडक्या बहिणी म्हणजे एकनाथ शिंदेने पगारी मतदार निर्माण केले होते. पगार द्या आणि मत घ्या. त्यापेक्षा आम्हाला रोजगार निर्माण करून द्या, असे स्वाभिमानाने सांगायला हवे होते, असे त्यांनी सांगितले.
‘ती’ ठेकेदाराची सेना
शिवसेना सोडून कवरे गेले आणि कवरे आले, पण शिवसेना आहे तिथेच असल्याचे सांगून जे गेले ती ठेकेदाराची सेना असल्याचे त्यांनी सांगितले. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, इथे पुन्हा शिवसेना उभारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.