शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडला होणार नगरपंचायत

By admin | Updated: April 10, 2016 00:56 IST

राज्यातील १३७ पैकी १०९ नगरपंचायती अस्तित्वात आल्या असून उर्वरीत सर्व नगरपंचायती एप्रिल अखेरीस अस्तित्वात येतील अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ़ रणजित पाटील यांनी विधानसभेत

- राहुल वाडेकर, विक्रमगड

राज्यातील १३७ पैकी १०९ नगरपंचायती अस्तित्वात आल्या असून उर्वरीत सर्व नगरपंचायती एप्रिल अखेरीस अस्तित्वात येतील अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ़ रणजित पाटील यांनी विधानसभेत केल्याने विक्रमगड नगरपंचायत स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. असे झाल्यास पालघर जिल्हयातील बोईसर, सरावली, तलासरी, वाडा, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे काय असाही प्रश्न निर्माण होत आहे़ अस्तित्वात येणार असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या पदांच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता देण्यांत येईल अशीही ग्वाही त्यांनी दिली. नव्याने निर्माण झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १८५ मुख्याधिकारीपदांसाठी परीक्षा घेण्यात आली़ त्याचा निकाल नुकताच लागला असून येत्या दोन ते तीन महिन्यांत मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल़ या नवनिर्मित नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी कर्मचारी नियुक्ती करण्यासाठी आकृतिबंध तयार करण्यांत येत असून पदानिर्मितीस मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत मान्यता मिळेल असेही सांगण्यात आले आहे़ दरम्यानच्या काळात या नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी १८६ कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे़ तालुका मुख्यालय आणि तेथे ग्रामपंचायत असल्यास याठिकाणी लोकसंख्येचा निकष न लावता अशा ठिकाणी नगरपंचायत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ २५ हजारावर लोकसंख्या असल्यास त्या ठिकाणी नगरपरिषद तयार करण्यांत येते़ अशा ठिकाणी मुख्याधिकारी नियुक्ती करतांना अव्वल, कारकुन, लेखाधिकारी यांचा अनुभव लक्षात घेवुन त्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे.निवडणूकीवर प्रश्नचिन्ह :-ग्रामपंचायतीची निवडणूक १६ एप्रिलला होणार आणि नगरपंचायत एप्रिलच्या अखेरीस अस्तित्वात येणार यामुळे आता निवडणूकीचे करायचे काय? हा प्रश्न कायम आहे. बहिष्कार कायम राहिला तर नगरपंचायतीच्याच निवडणूका होतीलबहिष्कार लागला सार्थकीविक्रमगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा प्रस्ताव नगरविकास मंत्र्यांकडे प्रस्तावित असतांनाही नगरपंचायतीची घोषणा न झाल्याने व १७ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रापंच्या निवडणुकींवर येथील जनतेने बहिष्कार टाकला होता. त्यानुषंगाने हा विषय विधानसभेमध्ये गेल्याने त्यावर तातडीने निर्णय घेण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे़ त्यामध्ये प्रस्तावित नगरपंचायती एप्रिल अखेरपर्यत अस्तित्वात येण्याची शक्यता असल्यामुळे विक्रमगड येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणूक न लढविण्याचा निर्णय सार्थकी लागला आहे़