शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या पहिल्या महिला वरिष्ठ निरीक्षक ठरल्या मेघना बुरांडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 22:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  धीरज परब /मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय २०२० साली सुरु झाले . ...

लोकमत न्यूज नेटवर्क धीरज परब /मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय २०२० साली सुरु झाले . ४ वर्षात आयुक्तालयातील एका हि पोलीस ठाण्यात महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नव्हत्या . पण आयुक्तालयात पहिल्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मेघना बुरांडे यांची नियुक्ती झाली आहे . मीरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून त्यांना नेमण्यात आले आहे . 

 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची  १ ऑक्टोबर २०२० रोजी स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयचे उदघाटन केले गेले . पहिले आयुक्त म्हणून सदानंद दाते यांच्यावर टाकलेला विश्वास दाते यांनी देखील बऱ्याच अंशी सार्थ ठरवत नव्या आयुक्तालयाची झपाट्याने घडी बसवली . त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदासाठी कोणतीही महिला अधिकारी नसली तरी आता पर्यंत उपायुक्त , सहायक आयुक्त पदी महिला अधिकारी यांनी काम केले आहे . 

आयुक्तालयात सध्या १९ पोलीस ठाणी आहेत . परंतु पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी आता पर्यंत एकही महिला अधिकारीची नियुक्ती झाली नव्हती . विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून मुंबईतून आलेल्या मेघना बुरांडे यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे . 

बुरांडे यांचे वडील सांगलीच्या पलूसचे तर आई  कोकणातील पेंडूर कट्टा येथील . दोघेही मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत . घरात कोणीही पोलीस खात्यात नसले तरी वडिलांची इच्छा असल्याने खेळाडू असलेल्या मेघना यांनी पोलीस खात्यात भरती व्हायची जिद्द दाखवत २००५ साली त्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या . त्यांनी सहायक निरीक्षक असताना  मनोर , नाटे व मांडवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून जबाबदारी पार पडली आहे .  

त्यांनी आता पर्यंत रायगड , रत्नागिरी , ठाणे ग्रामीण , ठाणे शहर व मुंबई हद्दीत काम केले आहे . अनेक गुन्ह्यांची उकल करतानाच स्पष्ट व परखड शिस्तीच्या म्हणून त्या ओळखल्या जातात . गुन्हेगारीला आळा घालण्यासह नागरिकांशी संवाद साधणे , समाजात पोलिसां बद्दलचा विश्वास अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला असल्याचे सांगितले जाते . मेघना यांना डीजी इन्सिग्निया अर्थात पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह पदक देउन गौविण्यात आले आहे.

टॅग्स :Policeपोलिस