शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

वाडा बसस्थानक तडकाफडकी स्थलांतरीत

By admin | Updated: March 21, 2017 01:35 IST

येथील बस स्थानक नव्या जागी अचानक स्थलांतरीत करण्याच्या एस.टी.आगाराच्या निर्णयामुळे प्रवासी, चाकरमानी, व विद्यार्थ्यांचे

वाडा : येथील बस स्थानक नव्या जागी अचानक स्थलांतरीत करण्याच्या एस.टी.आगाराच्या निर्णयामुळे प्रवासी, चाकरमानी, व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. सोमवारी बससेवा एस. टी.आगार येथील नवीन बसस्थानकापासून सुरू करण्याच्या निर्णयाने परगावीच्या बस या खंडेश्वरी नाका येथूनच वळविण्यात येत होत्या, तर वाडा आगारातून सुटणाऱ्या भिवंडी, कल्याण, ठाणे, नगर, पुणे, इत्यादी बसेस या जुन्या स्थानकातसुद्धा येणार असल्याचे आगारामार्फत सांगण्यात येत होते.सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने आजूबाजूच्या परिसरातील इतर आगाराच्या बसने आलेले विद्यार्थी खंडेश्वरी नाक्यापासून धावपळ करीत परिक्षा केंद्रावर पोहचत होते. खंडेश्वरी नाका येथे बस पकडणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे आणि असुरक्षित आहे कारण तिथे कोणतीही शेड नाही आणि त्या रस्त्यावरून अवजड वाहने, ट्रक्स, आणि इतर वाहनांची सतत भरधाव वाहतूक सुरु असते त्यामुळे त्या ठिकाणी एसटी पकडण्याच्या धावपळीत अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे मत विद्यार्थी व प्रवासी व्यक्त करत आहेत. जुने वाडा शहर ते नवीन बस स्थानक हे अंतरही लांबचे असल्याने रिक्षा किंवा इतर वाहनाने नवीन बस स्थानकापर्यंत पोहचावे लागणार आहे. यात सर्वात अधिक पीडला जाणार आहे तो सामान्य व गरीब प्रवासी कारण रिक्षाचे भाडे त्याला परवडणारे नाही. नव्याने सुरू करण्यात आलेल्या बस स्थानक हे पूर्ण पडक्या स्थितीत असून प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, लाईट, पंखे, आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, गाड्यांचे वेळापत्रक, फलाट, उपहारगृह अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत तरीही घाईघाईने बसस्थानक स्थालांतरित का करण्यात आले असा संतप्त सवाल प्रवासी, विद्यार्थी व सामान्य नागरिक करीत आहेत. वाहतूक समस्या व अवैध वाहतूक यासंदर्भात झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या संदर्भात विचार विनिमय झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून येत्या काही दिवसांत एसटी आगाराच्या जागेत बांधून तयार असलेले बस स्थानक दुरुस्त करून तिथे अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा एसटीचा प्रयत्न राहील व तिथेच बाहेरील डेपोच्या बसेससाठी स्थानक सुरु होईल, असे समजते. (वार्ताहर )