वसईत 60 ते 70 गोदामांना भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 09:59 IST2018-11-08T09:48:56+5:302018-11-08T09:59:11+5:30
वसईच्या तुंगारेश्वर फाट्याजवळ 60 ते 70 गोदामांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सर्व गोदामं जळून खाक झाली आहेत.

वसईत 60 ते 70 गोदामांना भीषण आग
वसई - वसईच्या तुंगारेश्वर फाट्याजवळ 60 ते 70 गोदामांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सर्व गोदामं जळून खाक झाली आहेत. रात्री दीडच्या सुमारास प्लास्टिक आणि भंगारच्या गोदामांना आग लागल्याची माहिती मिळत आहे.
आगीची माहिती मिळताच वसई-विरार अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांच्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. आगीत भंगारची वाहतूक करणारी काही वाहनं जळून खाक झाली आहेत.