शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

वसईत सुपारीच्या झाडांवर संक्रांत, होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 3:17 AM

भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो.

वसई : भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. वसईत दरवर्षी होळीनिमित्त हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. परंपरेच्या नावाखाली ग्रामीण भागात सुपारी व भेंडीची झाडे कापून त्याची होळी केली जाते. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते.वसईतील ग्रामीण भागात पूर्वापार सुपारी तसेच भेंडीची झाडे होळीसाठी कापली जातात. यानिमित्त शेतीवाडीची साफसफाई होत असते. ग्रामीण भागात ‘एक गांव, एक होळी’ किंवा ‘एक आळी एक होळी’ ही संकल्पना असते. संकल्पना असते.मात्र सद्या शहरी भागातील निवासी संकुलात एक इमारत एक होळी पेटवली जाते. आता हे लोण शहरी भागातही पसरते आहे. केरकचरा आणि अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करण्याऐवजी शहरातील तरुणाई ग्रामीण भागातून सुपारीची झाडे कापून खरेदी करत आहेत. यात शेकडोच्या संख्येने सुपारीच्या झाडांची कत्तल करण्यात येते. ५०० ते २००० रूपये किमतीने हि झाडे होळी साठी कापली जातात. विशेष म्हणजे सुपारीच्या झाडांना गाभ्यातून विशिष्ट प्रकारची कोती असलेले झाड निवडले जाते. बॅन्जोच्या तालावर वाजत गाजत ट्रकमधून झाडे शहरात नेली जातात.विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनाच्या एक दिवस आधी होळी साजरी होणार आहे. ‘एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश दिला जात असताना हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे. वनदिवसाच्या एक दिवस आधीच वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. होळीसाठी झाडे तोडण्याऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी असे आवाहन पर्यावरण प्रेमी करित असतात. होळीच्या निमित्ताने दुर्गुणांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा, असेही सांगितले जाते. जागतिक वनदिनी वनाचीच होळी होईल असे कोणतेही कृत्य होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.दरवर्षी होळी सणानिमीत्त महाराष्टात सर्रास झाडांची कत्तल करत त्यांची सण-उत्सवाच्या नावाखाली होळी केली जाते.शहरी भागात जर होळी उत्सवासाठी ग्रामीण भागातून झाडे कापून जाळण्यासाठी आणण्यात येत असतील तर याबाबत चौकशी करण्यात येईल व यावर बंदी घालण्यात येईल.- बळीराम पवार, आयुक्त,वसई-विरार महानगरपालिकावसईतील ग्रामीण भागात पुर्वापार एक गांव एक होळी हि संकल्पना आहे.सुपारी अथवा भेंडीच्या झाडाची फांदी होळीसाठी वापरली जाते.मात्र गेल्या काही वर्षात शहरी भागात या उत्सवाचे व्यापारिकरण सुरू झालेले आहे.ग्रामीण भागातून बेसूमार झाडांची कत्तल केली जात आहे.- समिर वर्तक, समन्वयक,पर्यावरण संवर्धन समिती वसईहोळीसाठी बाजारजव्हार : जव्हार तालुका हा बहुतांश ग्रामीण आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका असून, तालुक्यातील लोकसंख्येसाठी जव्हार हीच एकमेव मोठी बाजारपेठ आहे. खेडोपाडयातील आठवडा भूरकुंड्या बाजारपेठत मंगळवारी मोठी गर्दी झाली होती.आदिवासी गावपाड्यांवर आठवडा बाजार भरतो. होळीसाठी किराणा सामान, कपडे, नारळ, खोबरा, हिरडा, रवा, साखर, गुळ आदी सामानांची दुकाने छोटेमोठे व्यापारी रस्त्यांवर मांडून बसतात. होळी हा सण ग्रामीण आदिवासी भागात मोठा मानला जातो.या सणाला रवा, मैदा, गुळ, खोबरा, नारळ, साखर आदी सामान खरेदी हे होळीचे मुख्य आकर्षण आहे. गेल्या वर्षी १० ते १५ रूपये नग विकला जाणारा नारळ यंदा २५/- रूपयांनी विक्र ी केला जात असल्यामुळे विक्र ी होणार की नाही असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. यंदा थोड्याफार प्रमाणात दरवाढ झालेली आहे.

टॅग्स :HoliहोळीVasai Virarवसई विरार