विक्रमगड तालुक्यातील अनेक भागातील भातरोपे कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:15 IST2019-08-14T00:15:01+5:302019-08-14T00:15:44+5:30
विक्रमगड तालुक्यात ९० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी भरून रोपे पाण्यात बुडली आहेत.

विक्रमगड तालुक्यातील अनेक भागातील भातरोपे कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात ९० टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे. मात्र, सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी भरून रोपे पाण्यात बुडली आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांची रोपे कुजली आहेत. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास भातशेतीला धोका निर्माण होऊन गेल्या काही वर्षांत जसे भातिपकाचे नुकसान झाले होते तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विक्रमगड तालुक्यासह खुडेद, ओंदे, शील, झडपोली, केव, म्हसरोली, सजन आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत. तर काहींच्या शेतात माती आल्याने भात पिके गाडली आहेत. अनेकांची भातशेती पाण्याखाली तसेच जास्त पावसामुळे लागवडीखालील भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. नुकसान झालेल्या शेतकºयांच्या भात पिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
सततच्या पावसाने माझ्या शेतातील भात पीक कुजले आहे. जर पावसाचे प्रमाण असेच राहिले तर भातिपकाची नासाडी होईल. वारंवार शेतकरी संकटात येत असून निसर्गाच्या या लहरीपणामुळे दिवसेंदिवस भातशेती करणे जिकिरीचे होते आहे. पुढील काळात जर अशीच परिस्थिती राहील्यास भातशेतीचे क्षेत्र कमी होण्याची चिन्हे आहेत. आज पारंपारिक व या भागात भातशेती हेच मुख्य पिक असल्याने शेतकरी करीत आहे. परंतु खर्च करु न जर पदरात निराशा पडत असेल तर शेतकºयांनी करायचे काय? - गजानन देऊ जाधव (शेतकरी)