शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: बहुजन विकास आघाडी भाजपच्या वाटेवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:49 IST

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; सहायता निधीसाठी पालिकेकडून २५ लाखांचा धनादेश

वसई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बोईसरचा आमदार फोडल्याने आणि नालासोपाऱ्यात आक्रमकरीत्या प्रदीप शर्मा यांना रिंगणात उतरविल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. बहुजन विकास आघाडीच भाजपमध्ये विलीन होत असल्याचे अंदाज बांधले जाऊ लागले. मात्र बविआच्या नेत्यांनी ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले.शिवसेनेशी मधुर संबंध असलेल्या बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते वसंत डावखरे यांचा विरोध असूनही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून झालेल्या निवडणुकीतही शिवसेनेला मदत केली होती. त्यामुळे डावखरेंचा पराभव करून शिवसेनेचे रवींद्र फाटक निवडून आले. मात्र पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळी शिवसेना-बविआ परस्परांविरोधात लढले. नंतर लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने शिट्टी हे चिन्ह काढून घेत बविआची पुरती कोंडी केली. आताही बोईसरमधील बविआचे आमदार विलास तरे यांना शिवसेनेत स्वगृही आणण्यात आले. नालासोपारा मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा क्षितिज याच्याविरोधात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उतरवून बविआच्या राजकीय अस्तित्वाला नख लावण्याचा प्रयत्न केला.वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात त्यांचे विरोधक, श्रमजीवीचे नेते आणि सध्या राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले विवेक पंडित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे, अशी तयारी मध्यंतरी सुरू होती. पंडित हे पूर्वीचे शिवसेनेचे उपनेते आहेत. ख्रिस्ती मतांचे विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी निवडणूक मात्र अपक्ष म्हणून लढवली होती.त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तातडीने बविआचे आमदार, महापौर यांच्यासह अन्य नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आणि तो पक्ष भाजपमध्ये विलीन होत असल्याच्या चर्चेला तोंड फुटले. मात्र सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी वसई-विरार महापालिकेने गोळा केलेल्या २५ लाखांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी ही भेट झाल्याचे बविआच्या नेत्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रवीण शेट्टी, आमदार क्षितिज ठाकूर, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, पालिका आयुक्त बळीराम पवार, माजी महापौर नारायण मानकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना