शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 16:36 IST

विरारच्या एका हॉटेलमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोपांवर हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक उरला असताना विरारमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या सगळ्या प्रकारावरुन बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. विनोद तावडेंवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथे असलेल्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये मोठा राडा घातला. आमदार क्षितिज ठाकूर यांच्यानतंर हितेंद्र ठाकूर देखील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. भाजपकडूनच विनोद तावडे पैसे घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोपांवर हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला भाजपवाल्यांनी सांगितले होते की विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन येत आहेत. मला वाटलं राष्ट्रीय नेते एवढं लहान काम करणार नाहीत. एकडे आलो तर बघितलं की पैसे मिळालेत, वाटप पण सुरु आहे. आता लपून बसले आहेत. त्यांच्याकडे डायरी पण सापडली आहे. निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. हॉटेलचे सीसीटीव्ही बंद होते. आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही सुरु करण्यात आले आहेत.  मधल्या काळातले सीसीटीव्ही कुठे गेले याची माहिती घेतली पाहिजे," असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

"विनोद तावडेंनी २५ फोन केले" 

"पाच कोटी रुपये घेऊन विनोद तावडे तिथे आले होते. दोन डायऱ्यादेखील तिथे मिळाल्या आहेत. कुठे कसं वाटप केलं वगैरे माहिती त्यात आहे. विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. यांना एवढी अक्कल नाही की नेत्यांनी ४८ तास आधी इतर मतदारसंघ सोडायचे असतात. एवढा साधा नियम आहे. आज कार्यकर्त्यांची बैठक होती आणि काय चाललंय हे? आता पोलीस काय करतायत हे बघायचं आहे. प्रत्यक्ष पैसे वाटप होत असताना मी पाहिलेलं नाही. पण तिथे पैसे वाटले गेले आहेत. विनोद तावडे मला फोन करून विनंती करत आहेत की सोडवा यातून, माझी चूक झाली. माझ्या फोनवर त्यांचे २५ फोन आले आहेत," असंही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VirarविरारVinod Tawdeविनोद तावडेHitendra Thakurहितेंद्र ठाकूर