शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आमच्या गळ्यातील चेन मोडायची आलीय वेळ, कसले ‘ब्रेक द चेन’? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:33 PM

छोट्या व्यावसायिकांचे धंदे झाले बंद  : गृहिणींची घर चालवताना कसरत

- सुरेश काटेलोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अभियान सुरू आहे. मात्र, त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य गृहिणींप्रमाणेच व्यापारी- व्यावसायिकांच्या कुटुंबांनाही घर चालविताना अडचणी येत आहेत. गळ्यातील ‘चेन’ मोडायची वेळ आहे, कसले आले आहे ‘ब्रेक द चेन’? असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे.गेले संपूर्ण वर्ष कोरोना प्रादुर्भावाच्या छायेत वावरत असताना, करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. व्यवसाय समाधानकारक झालेला नाहीच. मात्र, त्याचवेळी खर्च वाढलेला आहे. शासनाचे विविध कर भरताना व लाइट बिलासह अन्ये बिले भरताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत. अशा स्थितीत आम्हालाही आमचे घर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या तक्रारी अनेक व्यावसायिकांच्या घरांतून त्यांच्या पत्नींकडून होताना दिसत आहेत.

दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे बराच काळ व्यवसाय चालला नाही. मध्यंतरी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर दुकाने, तसेच अन्य व्यवसाय बऱ्यापैकी सुरू झाले. सुमारे दोन महिने दुकाने- व्यवसाय सुरू झाल्यांतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे आता कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे.

गेले वर्षभर कोरोनामुळे ब्युटीपार्लर व्यवसाय सुरुवातीला बंद आणि आता थोडा सुरू झाला असतानाच पुन्हा दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पार्लरचे भाडे, बँकेचे हप्ते कसे फेडायचे? ब्रेक द चेन कसले? जगणे ब्रेक व्हायची वेळ आली आहे.    -भावना प्रजापती, ब्युटीपार्लर व्यावसायिक, तलासरीकपड्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. वर्ष कसेबसे काढले. पुन्हा ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली दुकाने बंद झाली आहेत. आता घरखर्च चालवायचा कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जाचा डोंगर वाढत आहे. जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.    - निमा अमरनाथ गुप्ता,     लेडीज गारमेंट, तलासरी

गेले वर्षभर कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय व्यवसाय ठप्प झालेले आहे. आता कुठे सावरू लागला असतानाच व्यवसाय बंदमुळे आवक बंद असताना खर्च मात्र कमी होत नाही. त्यात बंदचा फायदा उचलत अनेक वस्तूंचे भाव वाढविण्यात आले. त्यामुळे घरखर्च भागविणे कठीण झाले.    - मृदुला राजगिरे, दापचरी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस