शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुरुच्या बागेजवळ बेकायदा भराव

By admin | Updated: March 25, 2016 00:33 IST

वसई गावातील सुरुच्या बागेजवळील पाणथळ जागेत बेकायदेशिरपणे मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. याप्रकरणी

वसई : वसई गावातील सुरुच्या बागेजवळील पाणथळ जागेत बेकायदेशिरपणे मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयातून चौकशी करून तहसिलदारांना बेकायदा माती भराव प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. तर जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी भूमीअभिलेख कार्यालयाला कळवण्यात आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात महसूल कार्यालयाची संशयास्पद भूमिका असल्याचे समोर येऊ लागले आहे. वसईचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आणि पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. याठिकाणी असलेल्या सुंदर अशा सुरुच्या बागेशेजारी २५ एकर पाणथळ जमिन खाजगी मालकीची आहे. त्यात तिवरांची झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. ही जागा पाणथळ असल्याने संरक्षित आहे. याठिकाणी मोठया प्रमाणावर मातीचा बेकायदेशीर भराव करून रस्ता तयार करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंंदा गुंजाळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर नायब तहसीलदार अर्चना खंडागळे यांनी जागेवर जाऊन तपासणी केली. आता सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या लोकांना नोटीसा बजावून चौकशी करण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी जमिनीत येऊ नये यासाठी बेकायदा माती भराव करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)भराव झाल्याचे दिसून आले असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे तहसील कार्यालयाला कळवण्यात आले आहे. तसेच भूमिअभिलेख कार्यालयाला जागेचे सर्वेक्षण करण्याचे कळवण्यात आलेले आहे. तिवरांची झाडे तोडल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलेले नाही.- अर्चना खंडागळे, नायब तहसिलदारमहसूल खात्याची भूमिका संशयास्पद आहे. बेकायदा माती भराव केल्याचे दिसत असून अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. महसूल खात्याकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबवून पुरावे नष्ट करण्यास वाव दिला जात आहे. - गोविंदा गुंजाळकर, तक्रारदारजमीन मोजणीचे प्रांताधिकारी कार्यालयातून फक्त पत्र आलेले आहे. ती करण्यासाठी जागेचे मालक कोण, सातबारा उतारा, संबंधित कागदपत्रे, जर जागा सरकारी असेल तर तसे आदेश लागतील. कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय मोजणी करता येत नाही.- योगेश्वर सावकार, भूमिअभिलेख