शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दत्तक गावाची होळी ‘कोरडी’च!

By admin | Updated: March 25, 2016 00:35 IST

प्रत्येकाच्या हाताला काम आणि काम करेल त्याला दाम या तत्वाखाली रोजगार हमी योजना राबविली जात असली तरी, जव्हार तालुक्यातील धनोशी या गावातील गावकऱ्यांनी आकरा

जव्हार : प्रत्येकाच्या हाताला काम आणि काम करेल त्याला दाम या तत्वाखाली रोजगार हमी योजना राबविली जात असली तरी, जव्हार तालुक्यातील धनोशी या गावातील गावकऱ्यांनी आकरा महिने उलटले तरी केलेल्या कामाचे दाम मिळालेले नाही. विशेष म्हणजे कष्टकऱ्यांचे हे गाव आदर्श सांसद ग्राम योजने अंतर्गत असून खासदार चिंतामण वनगा यांना ते दत्तक दिले आहे.आगोदरच पाऊस नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या वारली जमातीच्या गावाला आधार होता तो मजुरीच्या पैशाचा. गावातील जानू वरठा याला विचारले असता होळी निमित्त खरेदीच झाली नसल्याने गोडधोडाचा विषयच नव्हता असे त्याने लोकमतशी बोलतांना सांगितले. गावातील मजुरांनी ४ नंबर फार्म भरून येथील मजुरांना दोन दिवसातच रोजगार हमीवर कामे दिली होती. त्यावेळी धानोशी गावातील ११८ रोहयो मजूर, डोहारेपाडा ३६ मजूर, पालविपाडा ३५ मजूर असे एकंदरीत १८९ मजुरांनी कष्ट उपसले होते. रोजगार हमीवर तलावातील गाळ काढण्यासाठी, ग्रामपंचायतस्थरावर धनोशी गावात ई-मस्टर काढून, रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून ही कामे केली आहेत. रोजगार हमीची ही कामे मे व जून महिन्यात करण्यात आली होती. मात्र रोजगार हमीवर कामे करून ११ महिने झाले तरीही मजुरांना रोजगार हमीच्या कामाची मजुरी नाही. कामे करून दिवाळी गेली, आता होळीही झाली परंतु मजुरांना मजुरी मिळाली नसल्याचे कामिनी भामरा यांनी सांगितले.- जव्हार तालुक्यापासून अवघ्या १४ कि.मी. अंतरावर असलेले धानोशी गांव हे खासदार- चिंतामण वनगा यांनी यांनी संसद ग्राम आदर्श गांव दत्तक गांव घेतले आहे. या गावाला दत्तक घेवून या धानोशी गावात रोजगार उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे, रस्ते, लाईट, शिक्षण असा सुविधा करून देण्याचे वर्षभरापूर्वी घोषित केले होते. मात्र रोजगार हमीवर कामे करून ११ महिने उलटूनही मजुरी मिळत नसल्याची घर क से चालवायचे हा प्रश्न धनोशी मजुरांना पडला आहे.खासदारांनी दत्तक घेतलेल्या धानोशी गावात रहाणाऱ्या आम्ही गावकऱ्यांनी रोजगार हमीवर काम केले आहेत. परंतु कामे करून दिवाळी नंतर होळीही झाली तरीही आम्हला केलेल्या कामाची मजुरी नाही. - शांताराम पिलेना, रोहयो मजूर धनोशी