शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

हेडमास्तरांची विद्यार्थ्याला बेल्टने जबर मारहाण, माइकवरून द्यायला लावली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:41 IST

नालासोपा-यात रॅगिंगमुळे एका शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच एका शाळेतील विद्यार्थ्याने लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेऊन मुख्याध्यापकाने त्याला बेल्टने बेदम मारहाण केली

वसई : नालासोपा-यात रॅगिंगमुळे एका शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच एका शाळेतील विद्यार्थ्याने लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेऊन मुख्याध्यापकाने त्याला बेल्टने बेदम मारहाण केली. तसेच माईकवरून हा प्रकार केल्याची कबुली द्यायला लावल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन येथील सेंट नॉलेज कॅम्पस या शाळेत नववीत शिकत असलेल्या जय पाटील या मुलाला मुख्याध्यापक स्टॅनी पिंटो यांनी आपल्या केबिनमध्ये बेल्टने बेदम मारहाण केली. मुलांसमोर तो लैंगिक चाळे करीत असल्याची तक्रार काही मुलांनी करताच संतापलेल्या पिंटो यांनी केबिनमध्ये जयला अमानुष मारहाण केली. त्यानंतर शाळेच्या मैदानात आणून पुन्हा मारहाण केली. इतकेच नाही तर हा प्रकार व त्याला झालेली शिक्षा शाळेतील सर्व मुलांना समजावी यासाठी असा प्रकार केल्याची कबुली त्याला माईकवरून देण्यासही त्यांनी भाग पाडल्याची तक्रार त्याची आई भूमिका पाटील यांनी केली आहे. त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी जयसोबतच मस्ती करीत असल्याचे कारण दाखवत ऋतुराज धोत्रे आणि शुभम घोसाळ या दोन विद्यार्थ्यांनाही मारहाण केल्याचे पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. जयला त्वचेचा आजार झाला असून त्यावर औषधोपचारही सुरु आहेत. त्यामुळे त्याच्या गुप्तांगाला खाज आल्यानेच जयने असहय झाल्याने खाजवले. पण, मुख्याध्यापकांनी त्याची बाजू ऐकून न घेताच विक्षिप्त चाळे करीत असल्याच्या तक्रारीवरून जयला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर डीवायएसपी दत्ता तोटेवाड यांनी आपल्या हद्दीतील सर्व शाळांमधील शिक्षक, कर्मचारी, बस ड्रायव्हर आणि पालकांच्या बैठका बोलावून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहनही केले. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, बसमध्ये विद्यार्थी सुरक्षित रहावेत यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन केले. कोर्टाच्या निर्देशानुसार विद्याथ्यांच्या सुरक्षिततेचे पालन केले पाहिजे. अन्यथा संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही तोटेवाड यांनी यावेळी दिला.

टॅग्स :SchoolशाळाCrimeगुन्हाPoliceपोलिस