शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञातांनी पेटवले माजी सरपंचाच्या शेतातील घर

By admin | Updated: December 27, 2016 02:18 IST

तालुक्यातील दादरकोपरा गावातील माजी सरपंच- बाबन काकड भोरे- ५५ या माजी सरपंचांचा अज्ञात चोरांनी मनात राग धरून शेतावरील घर शनिवारी रात्री पेटवून दिले.

जव्हार : तालुक्यातील दादरकोपरा गावातील माजी सरपंच- बाबन काकड भोरे- ५५ या माजी सरपंचांचा अज्ञात चोरांनी मनात राग धरून शेतावरील घर शनिवारी रात्री पेटवून दिले. यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अज्ञात चोरांन विरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.तालुक्यातील दादरकोपरा गावातील यापूर्वी सलग गेली २५ वर्ष माजी सरपंच असलेल्या बाबन भोरे यांची आंबा, काजूची वाडी आहे. त्यातच त्यांचे घर आहे. ते अज्ञातांनी पेटवून दिले. यामध्ये झोडणी केलेला भाताचा पेंढा, आंबा, काजू, निलगिरीची व वाडीतील इतर झाडे पेटली आहेत. यामध्ये पावसाळ्यात जनावरांना खाण्यासाठी व बुजनी करण्यासाठी राखून ठेवलेल्या भाताच्या पेंढ्यांना आग लावण्यात आली आहे. घराच्या समोर ठेवलेली लाकडे, वासे या आगीत खाक झाले आहेत. जीवित हानी झाली नाही, मात्र हजारो रु पयांचे नुकसान झाले आहे.एकेकाळी याच घरात सरपंचांचे कुटुंब राहत होते. तर याच शेतावरील घराजवळ शेतीचे सर्व पीक साठवून ठेवण्यात येत होते. त्यावेळी जर का अज्ञातांनी शेतावरील घराला आग लावली असती तर वर्षभराचे पिक खाक झाले असते, असे माजी सरपंचाने सांगितले. शेतावरील घराला ज्या ठिकाणी आग लावण्यात आली आहे. त्या कुंपणाजवळ सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या आढळल्या. त्यामुळे आग लावण्यासाठी त्यांचाही वापर केल्याचे दिसते याची नोंद जव्हार तहसीलदार महसूल विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)