शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सूर्या धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क स्थानिकांचा; डहाणूत पाणी परिषद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 3:36 AM

सूर्या प्रकल्पातून तारापूर औद्योगिक क्षेत्राला ५२ दशलक्ष घनमीटर, वसई-विरार महापालिकेसाठी ५०३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात येत आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : सूर्या धरणाच्या पाण्यावर पहिला अधिकार स्थानिकांचा आहे, असा इशारा सूर्या पाणीबचाव संघर्ष समितीने पाणी परिषदेत दिला आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत ३६ हजार ७४० एकर इतक्या लाभ क्षेत्राकरिता सिंचन सुविधा अबाधित राहण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात यावी, वेगवेगळ्या शहरांना पाणीपुरवठा होताना लगतच्या गावांमध्ये व लाभ क्षेत्रामधील गावांना पिण्याचे पाणी पुरवण्यात यावे तसेच वेती गावातील प्रत्येक घरामध्ये नळपाणी योजना सुरू करावी, या व इतर मागण्यांसाठी पाठपुरावा आदी मुद्दे वाणगाव खंबाळे येथे मंगळवारी झालेल्या परिषदेत ठरवण्यात आले.

या परिषदेत आमदार श्रीनिवास वनगा, विनोद निकोले, सुनील भुसारा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती सुशील चुरी, बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समिती सभापती व उपसभापती तसेच प्रकल्पबाधित शेतकरी, स्थानिक आदिवासी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सूर्या प्रकल्पातून तारापूर औद्योगिक क्षेत्राला ५२ दशलक्ष घनमीटर, वसई-विरार महापालिकेसाठी ५०३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात येत आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत साठवण्यात येणाऱ्या पाण्यापैकी ७९ टक्के पाणी बिगर सिंचनासाठी वळवण्यात आले आहे. यासंदर्भात यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर राज्यपालांशी झालेल्या चर्चा हाेऊन पाटबंधारे प्रकल्पातील ३६ हजार ७४० एकर लाभक्षेत्रात सिंचन व्यवस्था कायम ठेवण्याबाबत निर्णय घेतला होता. यादृष्टीने पाटबंधारे विभाग, नगरविकास विभाग तसेच आदिवासी विकास विभागाच्या सचिवस्तरीय समितीची स्थापना करून या निर्णयाबाबतची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत.

परिषदेतील महत्त्वपूर्ण ठराव

  • मूळ सूर्या प्रकल्पात ठरल्याप्रमाणे सिंचन क्षेत्रात कपात करण्यात येऊ नये.
  • कालव्यांची तत्काळ दुरुस्ती व वितरण वाहिन्यांची नूतनीकरण कामे सुरू करावी.
  • प्रस्तावित सिंचन क्षेत्रात आवश्यक पाणी उपलब्ध होईपर्यंत पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये.
  • प्रकल्प क्षेत्रात शेतकऱ्यांच्या पाणीवापर संस्था स्थापन करण्यात याव्यात.
  • बिगर सिंचन क्षेत्रातील ग्राहकांकडून पाणीपट्टीद्वारे मिळणाऱ्या महसुलातून आदिवासी शेतकऱ्यांची पाणीबिले भरण्याची तरतूद करावी.
  • नागरी-शहरी भागांतील घरगुती व औद्योगिक वापरासाठी पाण्याचा पर्यायी वापरण्यात यावा.
  • पाण्याच्या आरक्षणात नव्याने वाढ करण्यात येऊ नये.
टॅग्स :Vasai Virarवसई विरार