शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेडचा भंग करून भराव

By admin | Updated: March 24, 2017 00:56 IST

येथील मुंबई अहमदाबाद महामार्ग परीसरात राजरोसपणे सीआरझेड कायद्याचा भंग करून जेसीबी वापरून मातीचा भराव घालणे सुरु आहे.

मनोर : येथील मुंबई अहमदाबाद महामार्ग परीसरात राजरोसपणे सीआरझेड कायद्याचा भंग करून जेसीबी वापरून मातीचा भराव घालणे सुरु आहे. याबाबत लोकमतच्या प्रतिनिधीने थेट प्रांताधिकारी गजरे यांच्या कानावर हा प्रकार घातल्यावर त्यांनी लेखी तक्रार करा मग बघू असे उत्तर देऊन सदर विषयाबाबत आपले धोरण स्पष्ट केले. हा भाग मनोर अधिकारी कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येतो. मनोर, मस्तान नाका, चिल्हार बोईसर रस्त्यालगत सीआरझेड क्षेत्रामध्ये येणाऱ्या जमिनीवर बांधकामे झाले असून नव्याने काही ठिकाणी ती आजही सुरु आहेत. बिनशेती (एन.ए.) परवानगी मिळालेली नसतांना तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने बिल्डर लॉबी आपले उखळ पांढरे करीत असून यात सर्वसामान्यांची मोठी फसवणूक सुरु आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन्ही बाजूला असलेल्या आदिवासी जमिनींवर बांधकामे सुरु आहेत. हलोली, चिल्हार, दुर्वेस, वेलगाव, बेलपाडा व टेन या ठिकाणी माती भरावाची कामे सुरु आहेत. येथे महसूल विभागाकडून अर्धवट रॉयल्टी घेतली जात आहे. ही बाब मंडळ अधिकारी बार्वे यांच्या निर्देशनात आणून दिली असता ‘मी बघतो, तलाठ्यांना सांगतो’ असे सरकारी उत्तर देऊन कोणतीही कारवाई करत नाहीत. प्रांत अधिकारी विकास गजरे पालघर यांना व तहसिलदार महेश सागर यांना महसूल भवनांचा उदघाटन वेळी ही बाब पत्रकारांनी लक्षात आणून दिली होती. त्यावर कारवाई करू असे मोघम उत्तर त्यांनी दिले. (वार्ताहर)