शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंच्या विधानाचा अप्रचार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:03 IST

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पोलिसांना निवेदन

आशिष राणे 

वसई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा दुरुपयोग करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द बोलून खोटा प्रचार करणाऱ्या व त्यांचा पुतळा जळणाऱ्या वसई विरार भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने वसई विरार पोलिस आयुक्तालय तर्फे वसई विरार मधील तुळींज, पेल्हार आदी विविध पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले अशी माहिती वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी दिली.यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील स्थानिक गाव गुंडाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संबंध जोडून भाजपच्या लोकांनी पंतप्रधान पदाचा अपमान केला आहे. अशा खोट्या बातम्या, खोटा प्रचार, प्रसार करणाऱ्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच अशा लोकांनी सोशल मीडियावर केलेल्या खोट्या अपप्रचाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. तसेच सोमवार दि. १७ जानेवारी २०२२ रोजी वसई विरार शहर जिल्हा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट व भाजपचे पदाधिकारी व समर्थक यांनी नालासोपारा पूर्वेला राधाकृष्ण हॉटेल परिसरात काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचा पुतळा जाळला आहे. प्रसार माध्यमातून याचे चित्रण व बातम्या प्रसारित झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेऊन सर्व संबधितांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी असेही शेवटी निवेदनात म्हटले होते.

त्याप्रमाणे पोलिसांनी तुळींज पोलिस ठाण्यात भाजपच्या संबंधित १५ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा रजि नं. ४०/२०२२ नुसार भा. दं. वि. सं. कलम २६९, २७०, १८८ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१)(३), १३५ तसेच साथरोग प्रतिबंध १८९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी लोकमतला दिली एकूणच अपप्रचार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा या निवेदनाची प्रत देण्यात आल्याचे ओनिल आल्मेडा यांनी याप्रसंगी सांगितले 

टॅग्स :BJPभाजपाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस