मीरारोडच्या ब्लिंकिंट गोदामात मुदतबाह्य पेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 22:37 IST2025-11-24T22:36:37+5:302025-11-24T22:37:57+5:30
...मात्र एका मुलीस उलटी सारखे वाटू लागल्याने त्या शीतपेयांच्या टेट्रापॅक वरील मुदत तपासली असता ते सर्व मुदतबाह्य असल्याचे आढळून आले.

मीरारोडच्या ब्लिंकिंट गोदामात मुदतबाह्य पेय
मीरारोड- मीरारोडच्या ब्लिंकिटच्या नावाने चालणाऱ्या गोदामात मुदतबाह्य पेय व खाद्य सापडल्याची तक्रार मनसेने केली असून घटनास्थळी पोलिसांनी येऊन खात्री केल्या नंतर अन्न निरीक्षक यांनी पडताळणी केली आहे.
मीरारोड भागातील मनसेचे पदाधिकारी नितीन लोटणकर यांनी त्यांचा मुलीचा वाढदिवस असल्याने लहान मुलांसाठी ब्लिंकिंट वरून टेट्रापॅक मधील २० शीतपेय मागवली होती. वाढदिवसाची शीतपेय मुलांना वाटली व मुलांनी ती पिऊन संपवली. मात्र एका मुलीस उलटी सारखे वाटू लागल्याने त्या शीतपेयांच्या टेट्रापॅक वरील मुदत तपासली असता ते सर्व मुदतबाह्य असल्याचे आढळून आले.
मनसेचे उलजिल्हाअध्यक्ष हेमंत सावंत, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन पोपळे, शशी मेंडन सह मनसैनिकांनी नया नगर पोलिसांना तक्रार केली तसेच शिवार उद्यान समोरील ओस्तवाल पॅरेडाइज मधील ब्लिंकिटच्या गोदामा सर्व गेले. गोदामातील काही पेय व खाद्य तपासणी केली असता त्यात टॉनिक वॉटर आणि मियॉनीज पॅकेट पण मुदतबाह्य आढळून आले. आलेल्या पोलिसाने गोदाम बंद करण्यास सांगितले. तर सोमवारी अन्न निरीक्षक दिपाली वंजारी यांनी गोदामात जाऊन पडताळणी केली. सदर प्रकरणात एका निवृत पोलिस अधिकारीचे नाव सांगून कारवाई होऊ नये म्हणून दबाव आणला जात असल्याचे एका मनसे पदाधिकारी यांनी सांगितले.