शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

स्कूलबस झाडावर धडकल्याने अकरा विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 1:56 AM

पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला माहीमजवळील पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. शाळेतील ११ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांसह चालक जखमी झाला.

पालघर : पालघर येथील सर जे. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या बसला माहीमजवळील पाणेरी नदीजवळ भीषण अपघात झाला. शाळेतील ११ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोमवारी झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांसह चालक जखमी झाला. जखमींपैकी ३ विद्यार्थ्यांसह चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित ८ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी बसचालक विष्णू पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पालघर-माहीम रस्त्यावरील हरणवाडी येथे जे. पी. इंटरनॅशनल ही पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. सोमवारी सकाळच्या सत्राची शाळा सुटल्यानंतर केळवे आणि मायखोप येथील प्राथमिकच्या ११ विद्यार्थ्यांना घेऊन दुपारी १ च्या सुमारास स्कूलबस निघाली. ती पानेरीच्या वळणावर आली असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला एका वडाच्या झाडाला धडकली.या अपघातात बसच्या टपासह आजूबाजूचा पत्रा उडून गेला. मुलांची रडारड पाहून माहीम गावातील लोकांनी जखमी विद्यार्थ्यांना मिळेल, त्या वाहनाने पालघरच्या ग्रामीण व खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, योग्य उपचार न मिळाल्याने त्यांना पालघरच्याच ढवळे रुग्णालयात दाखल केले. या वेळी शाळा व्यवस्थापनाकडून उशिरापर्यंत कोणीही उपस्थित नसल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण होते.मुलांना जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर अनेक पालकांना अश्रू अनावर झाले होते. रुग्णालयात पालकांची गर्दी जमल्याने पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाला त्यांना आवरणे कठीण जात होते. या वेळी शाळा व्यवस्थापनाकडून आलेल्या एका प्रतिनिधीकडे पालकांनी या अपघाताबाबत माहिती विचारल्यावर त्यांच्याकडून उलट उत्तरे मिळाल्याने पालकांनी त्याला घेराव घातला. सातपाटी सागरी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी बुलबुले, उपनिरीक्षक रोठे यांनी पालकांना संयम राखण्याचे आवाहन करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.गुन्हा दाखल करण्याची मागणीबसचे चालक विष्णू पाटील ६४ वर्षांचे असून, एसटी महामंडळातून निवृत्त झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर पालकांनी रु ग्णालयाबाहेर शाळेच्या उपस्थित प्रतिनिधींना धारेवर धरले. ज्या व्यक्तीची शारीरिक क्षमता कमी झाल्यानंतर एसटी प्रशासन त्यांना निवृत्त करते. अशा चालकांना नोकरीला ठेवणाºया शाळेच्या संचालकाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांनी या वेळी केली. त्यामुळे पोलिसांच्या तपासात हे मुद्दे पुढे येऊन बसची नोंदणी, विमा, बसची क्षमता आदी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :Accidentअपघात