गणेशोत्सवात नोटरी डेम स्कूलच्या परीक्षांमुळे वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:46 AM2018-09-12T02:46:48+5:302018-09-12T02:46:50+5:30

वसईमधील नोटरी डेम स्कूल प्रशासनाने गणेशोसत्व काळात परीक्षा ठेवल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे.

Due to the notary DEM School exams in Ganesh Festival | गणेशोत्सवात नोटरी डेम स्कूलच्या परीक्षांमुळे वाद

गणेशोत्सवात नोटरी डेम स्कूलच्या परीक्षांमुळे वाद

Next

नालासोपारा : वसईमधील नोटरी डेम स्कूल प्रशासनाने गणेशोसत्व काळात परीक्षा ठेवल्याने मोठा वादंग निर्माण झाला आहे. सीबीएससी बोर्ड असलेल्या इतर शाळानी या काळात कुठल्याच परीक्षा ठेवलेल्या नाहीत. मुंबई मध्येही गणेशोस्तव काळात परीक्षा नाहीत तरीही केवळ शाळा व्यवस्थापनाच्या हट्टापायी धार्मिक विद्वेष निर्माण केल्याची भावना पालक व इतर नागरीकांत निर्माण झाली आहे.
अधिक माहितीनुसार १३ ते २३ सप्टेबर काळात गणेशोस्तव आहे. शासनाच्या जीआर नुसार पाच दिवस सुट्टी आवश्यक आहे. असे असतानाही नोटरी डेम स्कूल , तरखड यांनी १७ ते २८ सप्टेबर काळात परीक्षाचे आयोजन केले, पालकांनी विनंती करून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. तरीही व्यवस्थापन बधले नाही. पालकांचा रोष वाढू लागल्याने याच परीक्षा १९ सप्टेबर पर्यन्त पुढे नेल्या तरीही गणेशोस्तव काळ समाप्त होत नसल्याने शाळा व्यवस्थापन धार्मिक आकस ठेऊन वागत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटिने केला आहे.
कॉंग्रेसने याबाबतच रोकठोक निवेदन नोटरी डेम स्कूल ला देऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. यामुळे हिंदू विद्यार्थी त्यांचे पालक यांना मनस्ताप होणार आहे. त्यांच्या श्रद्धा संस्कृती यास बाधा पोहोचवण्याचा हा प्रकार असल्याचाही आरोप करण्यात आलाय. शाळा व्यवस्थापन पुढील महिन्यात या परीक्षा घेऊ शकते. तरीही जाणीवपूर्वक मागील काही वर्षापासून गणेशोस्तव काळात मुलांना त्यांच्या बालपण, संस्कृती पासून मोडण्याचे हे प्रकार आहेत. अश्या आशयाचे पत्र गट शिक्षण अधिकारी, वसई यांनाही देण्यात आले आहे.
हे पूर्ण प्रकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना देण्यात येणार असल्याचे वसईतील काही संगठनानी स्पष्ट केले आहे. वसई हा सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने रहाणारा प्रदेश आहे. मात्र, प्राथमिक संस्कार, शिक्षण मिळणाऱ्या अश्या काही शाळा मधून जर असे प्रकार केले जात असतील तर पुढील पीढी नक्कीच धार्मिक संस्कृती विसरेल असाही आरोप केला जातोय.
शाळा व्यवस्थापनाने आता पालकांकडून जबरीने ना हरकत घेऊन परीक्षा बाबत आपली हरकत नसल्याचे लेखी अभिप्राय मुद्दाम घेण्यात येणार आहे. यामुळे आक्षेप घेणाºया पालकांची कोंडी करण्याचे प्रयत्न आहेत. असे झाल्यास राजकीय पक्ष ; विविध संगठना शाळे विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या निर्णया पर्यंत आल्या आहेत. मात्र, शाळा व्यवस्थापनाने आपले धोरण कायदेशिर व योग्य असल्याने स्पष्ट केले आहे.
>परीक्षा बाबत पालकांचे लेखी ना हरकत घेण्यात येईल. त्यामुळे आक्षेप रहाणार नाही. परीक्षा नियोजित वेळेतच घेतल्या जातील. याबाबत कमिटीशी चर्चा करून निर्णय घेऊ. मात्र, तक्र ार करणाºया पालकांची नावे सांगण्यात यावीत.
- मेरी चेतना : प्राचार्य ,नोटरी डेम
गणेशोस्तव काळात परीक्षा घेऊ शकत नाहीत. प्राचार्याना बोलावून याची कारणे विचारली जातील. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही करण्यात येईल.
- माधवी तांडेल : गट शिक्षण अधिकारी

Web Title: Due to the notary DEM School exams in Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.