शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

वारली चित्रकार अनिल वांगड यांची पेंटींग्ज पॅरिस येथील प्रदर्शनात महिनाभर प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:02 IST

फ्रेंच कला रसिकाने खरेदी केलीत चित्रे : वारली शैलीतून साकारला आयफेल टॉवर

- अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी : पद्मश्री कै. जिव्या सोमा म्हसे यांच्यानंतर त्यांचे गंजाड गावातील पस्तीस वर्षीय शिष्य अनिल वांगड यांना पॅरिस आर्ट गॅलरीत महिनाभर वारली पेंटिंग लावण्याचा बहुमान मिळाला आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांकडून त्यांच्या या चित्रांना खास पसंती मिळाली आहे. तर वारली चित्रशैलीतून साकारलेला आयफेल टॉवर तिथल्या भारतीय दूतावासाला भेट दिल्याची माहिती त्यांनी थेट पॅरिसहून लोकमतला दिली.वारली चित्राकर पद्मश्री म्हसे यांच्या प्रमाणेच अनिल वांगड यांनी इंडोनेशिया तर्फे दिल्या जाणाºया वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल या आंतरराष्ट्रीय पुरस्कारवर नाव कोरलेले आहे. त्यानंतर म्हसे यांच्या चित्रासह वांगड यांची चित्रं अनेक देशातील प्रदर्शनात लागल्यावर युवा वारली चित्रकार म्हणून त्यांची ओळख जगाला झाली. त्यानंतर त्यांना सिंगापूर, चीन, बेल्जियम, तैवान, अमेरिका, दक्षिण कोरिया, जर्मनी आणि इटली आदि राष्ट्रांच्या दूतावासांकडून ट्रायबल कला प्रदर्शनात त्यांची वारली चित्रे झळकली.दरम्यान म्हसे यांच्या मृत्यूनंतर १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१८साली पॅरिस येथे भरलेल्या दुप्पाट्टा असोसिएशन, गॅलरी ५९, रायवोली प्रदर्शांनकरिता भारतीय दुतावासाने वांगड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भारतीय सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून येण्या-जाण्याच्या प्रवास खर्चाची तरतूद झाल्यानंतर त्यांना तिथपर्यंत पोहचता आले.येथे जिव्या म्हसे यांनी बनवलेली सर्वाधिक वारली पेंटिंग हार्वे पेड्रीओली या फ्रेंच कला रसिकाने खरेदी केली आहेत. येथे एका कॉन्फरन्सच्या माध्यमातून म्हसे व वांगड यांच्या कलेविषयी माहिती जाणून घेण्याकरिता कॉन्फरन्स घेतली. तर येथील भारतीय दूतावासात प्रेझेंटेशन पार पडले. त्यावेळी वारली चित्रशैलीतून जगप्रसिद्ध आयफेल टॉवर चितारलेले पेंटिंग दूतावासाला भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. वांगड हे म्हसे यांच्या मुशीतून डहाणूतील गंजाड या गावातच घडलेले आदिवासी पारंपारिक वारली पेंटर आहेत. शिवाय त्यांनी आजच्या युगाचे नवीन विषय त्यांच्या कुंचल्यातून साकारले आहेत. त्यामध्ये बेटी बचाव, बेटी पढाव, पानी बचाव तसेच गौतमबुद्ध व महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र त्यांनी या शैलीतून साकारले आहे. वारलीपेंटिंग आणि एकूणच भारतीय संस्कृतीविषयी येथल्या रसिकांना विशेष स्वारस्य असून त्याबद्दल जाणून घ्यायला ते उत्सुक असतात. त्यांना म्हसे यांची चित्रं फारच प्रिय आहेत. आपली चित्रंही आवडल्याने, त्यांनी ती विकत घेतल्याचे वांगड म्हणाले. दरम्यान हा अविस्मरणीय अनुभव असल्याची भावना त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.हा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. येथील प्रदर्शनात मांडलेली चित्रं आण ित्या गोष्टींबद्दल रिसकांना कमालीची उत्सुकता असून चित्र खरेदीकडे त्यांचा कल जास्त आहे. येथे आलेले अनुभव देशात परतल्यावर येथील कलाकारांना सांगणार आहे. म्हसे यांच्यामुळे हे वैभव वारली चित्रकलेला प्राप्त झाल्याची अनुभूती थक्क करणारी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार