शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

एकरी ४० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 10:57 PM

विश्वनाथ पाटील : ओला दुष्काळ जाहीर करा

वाडा : अवकाळी पावसामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून ९० टक्के भातपीक नष्ट झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन शासनाने पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट एकरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मंगळवारी वाडा येथील पत्रकार परिषदेत केली.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने कापणीसाठी तयार झालेल्या भात पिकाची नासाडी केली आहे. सततच्या पावसाने भात पीक सतत पावसात बुडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या नुकसानीला पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही शासनाकडून पंचनामे करण्यासाठी विलंब होत आहे. तसेच विमा कंपन्यांकडूनही विम्याचे दावे दाखल करण्यासाठी जाचक अटी लादण्यात येत आहेत. त्यामुळे अगोदरच संकटात असणाºया शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत आहे.शेतकºयांची ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट नुकसान भरपाई देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली. नुकसानीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन पीक विमा कंपन्यांनी पंचनाम्याच्या जाचक अटीचा आग्रह न धरता शेतकºयांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी असेही पाटील म्हणाले.यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणांचा पुरवठा करावा, तसेच भात पीक शेतकºयांच्या हातून गेल्याने शेतकºयांसाठी खावटीसाठी रेशनिंगवर अल्प दरात धान्य उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. शेतकºयांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकºयांची निर्धार सभा येत्या ९ नोव्हेंबर रोजी वाडा येथील पी.जे.हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली असून यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वनाथ पाटील यांनी केले आहे. यावेळी कुणबी सेनेचे वाडा तालुका प्रमुख प्रल्हाद शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.पंचनामे करून भरपाई देण्याची काँग्रेसची मागणीच्जव्हार : सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते तसेच शेतकºयांनी जव्हारच्या अप्पर जिल्हाधिकाºयांकडे निवेदन देत केली आहे.च्दिवाळी संपली तरी पाऊस काही उघडण्याचे नाव घेत नाही. सततच्या या पावसामुळे भात पीक, नागली पिकून तयार झाली आहेत. पीक तयार झाल्याने अनेक शेतकºयांनी भात पीक कापून वाळत टाकले आहेत. पाऊस रोजच येत असल्याने पूर्ण कापून टाकलेले पीक पुरात वाहून जाऊन शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेसने अप्पर जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यावेळी काँग्रेस आदिवासी जिल्हा संघ अध्यक्ष बळवंत गावीत, तालुकाध्यक्ष केशव गावंढा, माजी उपनगराध्यक्ष धनंजय खेडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.दलित पँथरचे मोखाडा तहसीलदारांना निवेदनमोखाडा : परतीच्या पावसामुळे भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकºयाला भरीव मदत द्यावी, या मागणीचे निवेदन दलित पँथर संघटनेच्यावतीने मोखाडा तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी विभागीय जिल्हा अध्यक्ष बबलू शेळके, मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा, मोखाडा तालुका महासचिव कल्पेश लोखंडे, शहर अध्यक्ष इरफान शेख, शंकर भोये उपस्थित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरीRainपाऊस