शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

खाट न मिळाल्याने  उपचाराअभावी मृत्यू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 00:02 IST

डहाणूतील रुग्णाच्या नातेवाइकांचा आरोप

 

लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : आगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षाने रविवार, १८ एप्रिलच्या पहाटे खाट उपलब्ध नसल्याचे कारण देऊन ४२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला दाखल करण्यास नकार दिला. दरम्यान, रक्तदाबाचा त्रास वाढून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. गावच्या स्मशानभूमीत त्याच्यावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी राज्यातील आरोग्य यंत्रणेला, रुग्णांवरील उपचारासाठी खाटा उपलब्ध नसल्याचे उत्तर सहन केले जाणार नाही, अशा सूचना आणि इशारा दिला होता. त्याला चार दिवस उलटले नाही, तोच डहाणूत घडलेला प्रकार मन हेलावणारा आहे. ग्रामीण भागातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन विलगीकरण कक्षाची स्थापना करूनही खाटा उपलब्ध होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. गृहविलगीकरणात उपचार घेणार्‍या, ४२ वर्षीय व्यक्तीची प्रकृती रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक खालावली. त्यानंतर, त्याच्या नातेवाइकांनी आगर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षाशी संपर्क साधला. मात्र, खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत, रुग्णाला दाखल करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे जमिनीवर झोपवा. मात्र, उपचार सुरू करा, अशी विनवणी केल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. मात्र, नंतर नाईलाजास्तव रुग्णाला घरी आणल्यानंतर काही वेळाने त्याचे निधन झाले. तीन-चार दिवसांपूर्वी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो गृहविलगीकरणात होता. त्याला रक्तदाबाचा त्रास होता. 

धावपळ ठरली व्यर्थरुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे उपचाराचे दरवाजे बंद झाल्याने धावपळ व्यर्थ ठरल्याने  त्याचा मृत्यू ओढावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जीव धोक्यात घालून रुग्णाला दवाखान्यात नेण्यापासून ते अंत्यविधी करण्याचे काम नातेवाइकांनीच केले, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर यावेळी उपस्थितांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस