डहाणू रोड स्टेशनवर मालगाडीचा डबा घसरला, चर्चगेटच्या दिशेनं येणारी खोळंबली वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 07:43 PM2017-09-07T19:43:44+5:302017-09-07T22:58:08+5:30

खंडाळ्यापाठोपाठ आता डहाणूमध्येही मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरून खाली आला आहे

Dahanu road station collapsed, Churchgate shifted | डहाणू रोड स्टेशनवर मालगाडीचा डबा घसरला, चर्चगेटच्या दिशेनं येणारी खोळंबली वाहतूक

डहाणू रोड स्टेशनवर मालगाडीचा डबा घसरला, चर्चगेटच्या दिशेनं येणारी खोळंबली वाहतूक

Next

पालघर, दि. 7 - खंडाळ्यापाठोपाठ आता डहाणूमध्येही मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरून खाली आला आहे. चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक खोळंबली असून, लांब पल्ल्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डहाणू यार्डात रिकाम्या डब्यांची ने-आण करणारी मालगाडी सायंकाळी 6.40 वाजता यार्डाच्या दिशेने जात असताना दोन डबे रुळावरुन घसरले. यात कोणीही जखमी झालेले नाही. यार्डातील रुळावरुन डबे घसरल्यामुळे लोकल सेवेवर त्याचा परिणाम होणार नाही. पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सुरळीत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गजानन महतपुरकर यांनी दिली. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर सध्या परदेश दौºयावर आहे. 3 ते 17 सप्टेंबर या कालावधीत विशेष ट्रेनिंगसाठी भाकर मलेशिया आणि सिंगापूर येथे रवाना झालेले आहेत.

Web Title: Dahanu road station collapsed, Churchgate shifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.