CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारमध्ये आढळले २४ रुग्ण; बाधितांची संख्या ३४२

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:37 AM2020-05-19T00:37:43+5:302020-05-19T00:38:24+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : वसई-विरारमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४२ वर पोहचली आहे. १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus News in Vasai-Virar: 24 patients found in Vasai-Virar; The number of victims is 342 | CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारमध्ये आढळले २४ रुग्ण; बाधितांची संख्या ३४२

CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारमध्ये आढळले २४ रुग्ण; बाधितांची संख्या ३४२

Next

वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत सोमवारी २४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर, ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, विरारमध्ये ११ व १६ वर्षांची दोन मुले तर नालासोपारात १९ व २० वर्षांचे तरुण-तरुणी बाधित आढळले.
वसई-विरारमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४२ वर पोहचली आहे. १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारी पालिका हद्दीत वसईतील तीन, विरार पूर्व-पश्चिममधून दोन आणि नालासोपारामधून तीन असे एकूण ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आता कोरोनावर मात केलेल्यांची संख्या १७१ वर गेली आहे, तर १५८ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: CoronaVirus News in Vasai-Virar: 24 patients found in Vasai-Virar; The number of victims is 342

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.