शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बुलेट ट्रेन विरोधकांवर गुन्हे, वातावरण झाले तंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 3:10 AM

बुलेट ट्रेन च्या अधिकाऱ्यांनी साम दाम दंड भेद चा वापर करून सुरू केलेल्या अवैैध सर्वेक्षणाला विरोध करणा-या १५ ते २० ग्रामस्थांविरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पालघर : पडघा, कळम पाडा येथील जमीन मालकांची, ग्राम सभांची कुठलीही परवानगी नसतांना बुलेट ट्रेन च्या अधिकाऱ्यांनी साम दाम दंड भेद चा वापर करून सुरू केलेल्या अवैैध सर्वेक्षणाला विरोध करणा-या १५ ते २० ग्रामस्थांविरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील वातावरण तंग झाले आहे.मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ७४ गावातील २९३.६४ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. पालघर, विरार, बोईसर, तलासरी ह्या भागातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी ह्या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभा घेऊन मोठा विरोध दर्शविला आहे. १८ आॅक्टोबर रोजी पडघा (पालघर) येथे बुलेट ट्रेन च्या सर्वेक्षण च्या कामासाठी नियुक्त कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मोजणीचे काम करण्यासाठी आले असताना उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना जमिनीच्या सर्वेक्षणाबाबत परवानगीचे पत्र पहावयास मागितले. मात्र ते दाखविण्यास ते असमर्थ ठरल्याने ह्या प्रकल्पाचे जीपीएस पॉर्इंट टाकण्याच्या कामाला स्थानिकांनी विरोध दर्शविला. ह्या विरोधात बोईसर येथे राहणाºया एका कर्मचाºयांच्या फिर्यादी वरून पालघर पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे आदी कलमांखाली १५ ते २० स्थानिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.सोमवारी पडघे भागातील कळमपाडा येथे ४० ते ५० पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस अशी मोठी कुमक सोबत घेऊन बुलेट ट्रेन च्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. एवढ्या मोठ्या पोलीस फौज फाट्यामुळे छोट्याशा पाड्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांच्या भीतीने ह्या पाड्यातील अनेक घरांना कुलुपे ठोकीत कुटुंबीयांनी गावाच्या बाहेर राहणे पसंत केले. दिवसभर सर्वेक्षणाचे काम सुरू असतांना आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, राजू पांढरा, शशी सोनावणे, मान चे सरपंच मोरेश्वर डवरा आदींनी अधिकाºयाकडे कागदपत्रांची मागणी केली. आम्ही वनजमिनीचे सर्वेक्षण करीत असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी घटनास्थळी वन विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे धोदडे ह्यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्ताची पोलीस अधीक्षक कार्यालयात रीतसर मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत असतांना मात्र असे पत्र दाखविण्यात ते अपयशी ठरले. सिंचन क्षेत्र व इतर प्रकल्प जमिनीचे संपादन करण्यासाठी खाजगी वाटाघाटीची तरतूद या परिपत्रकाचा आधार घेत मोजणी सुरू करण्यात आली आहे असे अधिकाºयांनी सांगितले मात्र ह्या परिपत्रकाच्या विरोधात सांगली मधील काही तक्रारदारांनी उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना ह्या परिपत्रकाच्या आधारे बुलेट ट्रेन चे अधिकारी कन्सल्टंट नियुक्त करून सर्व्हे कसा करू शकतात असा प्रश्न शशी सोनावणे ह्यांनी उपस्थित केला. ह्या जमीन सर्व्हेेक्षण आणि अधिग्रहणा बाबत जमीन मालकांची परवानगी नाही, ग्राम सभेचा विरोधी ठराव, पेसा कायद्याचे उल्लंघन होत असतांना बेकायदेशीररित्या आमच्या शेतात घुसून जबरदस्तीने सर्व्हेक्षणाचा साम दाम दंड भेदाच्या जोरावर करण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही असे काळूराम धोदडे ह्यांनी लोकमतला सांगितले. ह्या विरोधात २६ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढण्याचा इशाराही या आंदोलकांनी दिला आहे. यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण असून ते संवेदनशीलतेने न हाताळल्यास मोठा उद्रेक घडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन