शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन सप्ताहात बोळिंजला प्रात्यक्षिके

By admin | Updated: April 19, 2016 01:34 IST

अग्निशमन सप्ताहानिमित्ताने वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध भागात प्रात्यक्षिके सादर करून लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत.

विरार : अग्निशमन सप्ताहानिमित्ताने वसई विरार पालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध भागात प्रात्यक्षिके सादर करून लोकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. १४ एप्रिल १९४४ ला मुंबई बंदरात एका दुर्घटनेप्रसंगी बचाव कार्य करताना अग्नीशमन दलाचे ६६ जवान हुतात्मा झाले होते. त्यामुळे १४ एप्रिल ते २० एप्रिल संपूर्ण •भारतात अग्नीशमन सेवा सप्ताह पाळला जातो. या सप्ताहानिमित्त वसई-विरार महापालिका अग्नीशमन दलातर्फेही जनतेचे प्रबोधन आणि जनजागृती करून आपातकालिन परिस्थितीत नागरिकांनी स्वत:सह इतरांचे प्राण कसे वाचवायचे? याची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली जात आहे. सध्या अग्नीशमन दलाकडे ४० मीटर उंचीपर्यंतच्या म्हणजे १४ मजल्यांपर्यतच्या शिड्या आहेत. त्यांचा वापर उंच इमारतींना लागणाऱ्या आगी विझवण्यासाठी चांगल्या प्रकारे होईल. आग प्रतिबंधक चांगल्या दर्जाचा गणवेश, हेल्मेट व्हॅन, रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, वॉटर टँकर, आदी साधनसामुग्री आहेत. वसई-विरारमध्ये कुठेही आग लागल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे अग्नीशमन दल सक्षम आहे. अत्याधुनिक यंत्रणा या दलाकडे आहे.•भूकंप झाल्यास मोठी दुर्घटना घडल्यास, इमारत कोसळल्यास, झाडातील मांजात पक्षी अडकल्यास आदींवर मात करण्यासाठी वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल नेहमीच तत्पर असते. त्यासाठी जवानांना खास प्रशिक्षण दिले जाते.अग्नीशमन दल केवळ आग विझवत नाही तर आगीच्या घटना घडू नये यासाठीही जनजागृती करते. नव्याने येणारे कारखाने, कंपन्या, इमारती, कार्यालये, उद्योग, व्यवसाय आगीच्या दृष्टीने सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.गणवेश आणि यंत्रसामुग्रीबाबत महापालिका, प्रशासन, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी कायम सकारात्मकता दाखवली आहे. वसई-विरार महापालिका अग्नीशमन दल हे मनुष्यबळ, कर्तृत्त्व, कौशल्य आणि यंत्रणा याबाबत नेहमीच वरचढ आहे. कर्मचारी, अधिकारी यांची कमतरता नाही. अग्निशमन सप्ताहात सेवांची माहिती व जनजागृती करण्यावर पालिकेने भर दिला आहे. आग लागल्यावर आधी काय करावे, काय दक्षता घ्यावी, फायरब्रिगेड येईपर्यंत कोणते उपाय करावेत, अशी माहिती नागरिकांना दिली जात आहे. (प्रतिनिधी)