शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा झाली फोटोचोर -गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:49 IST

वनगांच्या पत्नी, सून यांची संवाद यात्रा : पाणीप्रश्न सोडविण्याचे दिले आश्वासन

मनोर : भाजपची अवस्था फोटोचोरासारखी झाली आहे. ज्या वनगांची त्यांच्या हयातीत उपेक्षा केली. त्याच वनगांचा फोटो वापरून मते मागण्याची पाळी भाजपावर आली आहे अशी टीका आ. डॉ. नीलम गोºहे यांनी केली.लोकसभेचे शिवसेना उमेदवार श्रीनिवास चिंतामण वनगा यांच्या प्रचाराच्या वेळी केली. मनोर जवळील गोवाडे येथून त्यांनी संवाद यात्रेला सुरूवात केली. कै. चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्रीताई वनगा आणि धाकटी सून वर्षा वनगा यांच्या सोबत मनोर येथील गोवाडा गावापासून सुरूवात केली. या गावा मधील बैठकीमध्ये निरंकारी बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रचार मोहिमेत नीता पाटील, सदस्य जि. प. श्रद्धा घरत, पं स. सदस्य व शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.यावेळी स्थानिक महिलांनी गावातील पाण्याची व रस्त्याची समस्या मांडल्या. यावर त्यांनी ह्या समस्यां आपण जिल्हा पातळीवरच सोडवू पण गरज पडली तर विधिमंडळामध्येही पाठपुरावा करू असे स्पष्ट केले. दरम्यान पालघर जिल्हामध्ये सगळ्याच गावामध्ये पाणीप्रश्न असतांना पालघर जिल्हातील पाणी वसई विरारला कसे जाते असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.पुढे हमरापुर, कंचाड, आलोंडे, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा अशी ही संवाद मोहीम पार पडली या मोहिमेमध्ये रोशनी गायकवाड-धाराशिव, मृणाल यज्ञेश्वर-भिवंडी संपर्क संघटक, शुभदा शिंदे-शिर्डी संपर्क संघटक, वनिता देशमुख शिव सहकारी संघटना सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.भावना अनावरयावेळी चिंतामण वनगा यांच्या धाकट्या सून वर्षा प्रफुल्ल यांनी वनगा साहेबांनी भाजपची ४० वर्ष सेवा केली. पण जेव्हा आमच्या कुटुंबांला आधाराची गरज होती तेव्हा भाजपने आमच्या कुटुंबांला वा-यावर सोडले. पण जेव्हा आम्हाला राजकीयदृष्टया भाजपने रस्त्यावर आणले तेव्हा शिवसेनेने आम्हाला आधार दिला. त्यामुळे शेवटपर्यंत शिवसेनेचे काम करत राहू असे स्पष्ट केले. तर जयश्रीताई वनगा यांना दु:ख अनावर झाल्याने बोलता आले नाही.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018