शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : सेनेला शह देताना भाजपच हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:07 IST

पालघरमध्ये प्रकल्पांना मतदारांनी नाकारले; वनगा तरले, सवरा पडले

- हितेन नाईकपालघर : वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, बुलेट ट्रेन आदी प्रकल्पाना पालघर जिल्ह्यातील स्थानिकांचा विरोध असतानाही ते जबरदस्तीने त्यांच्यावर लादण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मतदारांनी मतपेटीतून उत्तर देत भाजपलाच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ‘आम्हाला गृहीत धरू नका, आम्ही तुम्हाला निवडून आणू शकतो, तसे घरीही पाठवू शकतो’, असा इशाराच जिल्ह्यातील मतदारांनी मस्तवाल सत्ताधाऱ्यांना या निर्णयातून दिल्याचे बोलले जात आहे. निकालानंतर बविआचा पाठिंबा मिळवण्याकरिता मित्रपक्ष शिवसेनेच्या विरोधात बंड करताना भाजपचीच गठडी वळली गेली.

गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजप-सेनेला पालघर, डहाणू, विक्रमगड या तीन जागांवर यश मिळवले होते. मात्र, यावर्षी भाजप - सेनेमध्ये वाढलेली दरी आणि बाहेरून आयात केलेले उमेदवार आणि स्थानिक भाजप-शिवसैनिकांमधील नाराजी भोवणार का, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच होती. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतर, संकटात सापडलेला शेतकरी, अशा प्रश्नांना बगल देत ३७० कलम रद्द करणे आदी मुद्यांचा डंका पिटणाºया भाजप सत्ताधाऱ्यांना पराभवाचे पाणी पाजीत जिल्ह्यातून हद्दपार केले.

जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई या सहा मतदारसंघात गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. डहाणू आणि बोईसर, येथील लढती शेवटपर्यंत रंगतदार झाल्याने दोन्ही बाजूच्या उमेदवारांच्या काळजाचा ठोका चुकला होता. डहाणू विधानसभेत एकूण दहा उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे विद्यमान आ. पास्कल धनारे विरुद्ध माकप महाआघाडीचे विनोद निकोले यांच्यात अटीतटीची लढत शेवट पर्यंत रंगली. इथे धनारे यांच्याविरोधात मोठी नाराजी असल्याने तसेच गट-तट असल्याने ते शमविण्यात त्यांना अपयश आले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा महाआघाडीला ८ हजार १४७ मते जास्त मिळाल्याने आपल्याला हा धोक्याचा इशारा आहे हे समजून न घेण्यात आ. धनारे अपयशी ठरले. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून स्वतंत्रपणे लढलेले काशिनाथ चौधरी यांनी निकोले यांना मदत केली. काँग्रेस, बहुजन विकास आघाडीची साथ मिळाल्याने माकपच्या निकोले यांनी भाजपच्या धनारे यांचा पराभव केला.

विक्रमगड मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप महायुती चे डॉ. हेमंत सवरा आणि राष्ट्रवादी महाआघाडीचे सुनील भुसारा यांच्यात झाली. या मतदारसंघात ६८.५१ टक्के अशा सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे साधारणपणे ७५ हजाराचा आकडा गाठणारा उमेदवार जिंकेल असा कयास होता. आदिवासी विकासमंत्री व पालकमंत्री म्हणून विष्णू सवरा यांच्या रूपाने या मतदारसंघात मोठे नेतृत्व मिळाले असूनही या मतदारसंघाचा विकास न झाल्याचे वास्तव विरोधकांनी मतदारापुढे मांडण्यात यश मिळवले होते. इथली बंडखोरी वरवर शमली असे वाटत असले तरी आतून आग धुमसत असल्याने त्याचा फायदा भुसाराना झाला.

२०१४ साली भुसारा यांना अवघी ३२ हजार ५३ मते पडली होती. त्यांच्या मताधिक्यात ५६ हजार ३७२ मतांची झालेली वाढ ही या सेना- भाजप मधली धुसफूस, भाजपमधली बंडखोरी, पालकमंत्री सवरांची निष्क्रियता तर दुसरीकडे डॉ. सवरा यांचा पराभव करून पुढच्या पाच वर्षात भाजप - सेनेतून नवीन स्थानिक उमेदवारी उभी करण्याच्या राजकीय खेळीचा परिपाक म्हणावा लागेल. पहिल्या फेरी पासून भुसारा यांनी घेतलेल्या आघाडीतून डॉ.सवराना सावरण्याची संधीच त्यांनी शेवटपर्यंत दिली नाही.

सत्तास्थापनेसाठी भाजपचे सेनेविरोधात बंड?

जिल्ह्यात आमचेच वर्चस्व असल्याचे बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीनही जागा जिंकून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिंकून आलो तर तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देईन असे आश्वासन हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याच्या शब्दानंतर जिल्ह्यात सेनेच्या विरोधात भाजपचे बंड उभे राहिल्याची चर्चा असून त्यातूनच या तीन मतदारसंघात भाजपने मदत न केल्याची चर्चा आहे.

पालघर विधानसभेत एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी सरळ लढत ही शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि काँग्रेस महाआघाडीचे योगेश नम यांच्यात झाली. पहिल्या चार फेºयांपर्यंत काँग्रेसचे नम यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीनंतर शिवसेनेचे वनगा यांनी मोडून काढली. त्यानंतर त्यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत वनगा यांनी नम यांचा तब्बल ४० हजार मतांनी दणदणीत पराभव केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस