खाक झालेल्या घरांची आमदारांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 23:34 IST2019-05-01T23:34:05+5:302019-05-01T23:34:27+5:30
तालुक्यातील ऐनशेत गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कातकरी वस्तीमधील दोन घरे खाक झाल्याची घटना

खाक झालेल्या घरांची आमदारांनी केली पाहणी
वाडा : तालुक्यातील ऐनशेत गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कातकरी वस्तीमधील दोन घरे खाक झाल्याची घटना शनिवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास घडली होती. आगीतघरातील कपडेलत्ते, धान्य, भांडी व घर जळून खाक होऊन अंदाजे एक लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे.
या घटनेची दखल घेऊन भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी वाडा प्रांताधिकारी अर्चना कदम यांना शासकीय मदत देण्याची सूचना करु न बुधवारी (दि. १) या घरांची स्वत: पहाणी करून पिडीत कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देवून या दोन कुटुंबांना तातडीचे आर्थिक सहाय्य म्हणून २० हजार रुपयांची मदत करणार असल्याचे सांगितले.
वाडा तालुक्यातील ऐनशेत गावात नवसू मुकणे व दिलीप मुकणे हे आपल्या कुटुंबासह राहत आहेत. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते कामानिमित्त बाहेर गेले असतांना शॉर्टिसर्किटने घराला आग लागून या आगीत दोन्ही घरे खाक झाली होती.