शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

वृद्ध शिक्षिकेवर लज्जास्पद आरोप; महिला आयोगाकडे दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:52 AM

तुळिंज पोलीस स्टेशन हद्दीत वसंत नगरी वसई पूर्व येथे राहणाऱ्या एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला पोलीसांनी बळाचा वापर करत मध्यरात्री पोलीस ठाण्यात नेले होते. वेश्याव्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर सोसायटीतील काही सदस्यांनी केला होता.

नालासोपारा : तुळिंज पोलीस स्टेशन हद्दीत वसंत नगरी वसई पूर्व येथे राहणाऱ्या एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला पोलीसांनी बळाचा वापर करत मध्यरात्री पोलीस ठाण्यात नेले होते. वेश्याव्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर सोसायटीतील काही सदस्यांनी केला होता. याबाबत शहानिशा न करता पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. या विरोधात राज्याचे गृहमंत्री, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य अल्पसंख्यांक आयोग व महिला आयोगाकडे दाद मागितली आहे.नालासोपारा पूर्व येथील सेक्टर ९, कावेरी को. हो. सोसायटीत फिलोमीना फर्नांडिस (७८) या निवृत्त शिक्षिका राहतात. सोसायटीतील काही सदस्यांबरोबर त्यांचा वैयिक्तक वाद आहे. त्यांचा मुलगा परदेशी नोकरीनिमित्त असून, मुलीचे लग्न झालेले आहे. २७ सप्टेंबर रोजी फिलोमीना यांच्या घरी त्यांचे नातेवाईक पाहूणे म्हणून आले होते. यावेळी रात्री १२:३० वाजता सोसायटीतील काही पदाधिकारी सदस्य पोलिसांना सोबत घेत जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसून त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावर न धाबता पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना रात्रीच्या वेळी महिला पोलीस नसतानाही तुळींज पोलीस ठाण्यात नेले होते. वयोमानानुसार धड चालू सुद्धा शकत नसलेल्या फिलोमीना यांना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. आपला गुन्हा काय तो तरी सांगा असे वारंवार सांगितल्यावर तुम्ही घरात वेश्याव्यवसाय करता असा गंभीर आरोप सोसायटीतील लोकांचा असल्याचे सांगताच त्यांना जबर धक्का बसला आहे.वैयिक्तक आकसेपोटी सोसायटीत काहींनी या वयोवृद्ध महिलेची केलेली ही क्रुर चेष्टा असून याबाबत आपण अप्पर पोलिस अधीक्षकांना लेखी तक्रार केल्याचे त्यानी सांगीतले. या निवेदनात वैयिक्तक आकसेपोटी सोसायटीतील दहा सदस्यांनी आपल्यावर गंभीर आरोप लावून आपली बदनामी केली असून २ पोलीस कर्मचाºयांनी त्यांना सहकार्य केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.वसईतील ‘मी वसईकर’ अभियानाचे वसंत नगरी येथील कार्यकर्ते अ‍ॅड. सुमित डोंगरे व अ‍ॅड. अनिल चव्हाण, अ‍ॅड जॉर्ज फरगोस, रामदयाला निषाद, विनायक निकम, लोव्हजॉय डायस, निलेश वर्तक व शेकडो कार्यकर्ते यांनी समनवयक मिलिंद खानोलकर यांच्यासह त्या पीडित वृद्ध शिक्षिकेची घरी जाऊन भेट घेऊन त्यांना धीर दिला. अप्पर पोलिस अधीक्षक वसई यांची या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्या वृद्ध महिलेला न्याय देण्यात यावा व चौकशी करण्यात यावी अशी मागणी १ आॅक्टोबर रोजी केली होती. चौकशी करून आपणास कळवतो असे आश्वासन त्यांनी त्यावेळेस दिले. परंतु १० दिवस उलटून गेले तरी प्रकरणाबाबत कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप मी वसईकर संघटनेकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकVasai Virarवसई विरार