शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

२० वर्षांनंतरही वाघ धरण प्रकल्प अपूर्णच; तिवरे धरणफुटीची पुनरावृत्ती होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 11:10 PM

७४ कोटींचा खर्च : प्रचंड गळतीमुळे पाण्याची नासाडी

रवींद्र साळवे मोखाडा : तालुक्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला वाघ प्रकल्प २० वर्षांनंतरही अपूर्णच असून अद्यापपर्यंत हा प्रकल्प व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाघ प्रकल्पाच्या धरणाला प्रचंड गळती लागली असल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

५१० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणून मोखाडा शहरासह लगतच्या गावपाड्यांना शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वाघ नदीवर सन १९९६ मध्ये या प्रकल्पाचे कामकाज हाती घेण्यात आले. १४ आॅक्टोबर १९८५ रोजी पाटबंधारे विभागाकडून ४ कोटी २५ लाख खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ९ वर्षानंतर पुन्हा ६ सप्टेंबर १९९४ रोजी ठेकेदाराच्या मूळ मागणीनुसार ९ कोटी ९६ लाख रुपये खर्चाच्या तरतुदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यानंतर ३ नोव्हेंबर २००१ रोजी प्रथम सुधारित मान्यतेनुसार २८ कोटी २ लाख रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली गेली. यानंतर द्वितीय प्रस्तावित मान्यतेनुसार ७९ कोटी ९० लाखांची तरतूद करून खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आतापर्यंत या प्रकल्पासाठी तब्बल ७४ कोटी ८२ लाख इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे.या धरणाचे बुडीत क्षेत्र १३५ हेक्टर १७ आर ०८ गुंठे असून १०.३० दश लक्ष घनमीटर पाणीसाठा होत आहे. या धरणाचे कामकाज गेल्या १५ वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. यानंतरही २० वर्षांचा कालावधी उलटला असतानाही अद्यापही या धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण झालेले नाही.वाघ प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झाले आहे. आता नवीन कोणतेच काम केले जाणार नाही. आमच्या विभागाकडून फक्त नवीन काम केले जाते, दुरुस्ती केली जात नाही. ज्या शेतकऱ्यांची जमीन कालव्यात गेली आहे त्यांची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना लवकरच मोबदला मिळेल. -एस. पी. मोरे, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, वाडावाघ प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नव्हताच. या प्रकल्पाचा काहीच फायदा येथील जनतेला झालेला नाही. वाघ धरणाला व कालव्याला देखील प्रचंड गळती लागली आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे. यामुळे आम्ही फौजदारी कारवाई करणार आहोत. -सारिका निकम, सभापती, मोखाडा पंचायत समिती

टॅग्स :Damधरण