शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीच्या बेकायदा सुरु असलेल्या बारवर कारवाई; आमदार स्नेहा दुबे यांची झाडझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 18:15 IST

दत्ताणी मॉलमधील विंग्स ऑन फायर आणि पंखा फास्ट हे दोन बार निर्धारित वेळेनंतरही सुरू होते. या ठिकाणी मोठा आवाजात डीजे वाजवला जात होता.

नालासोपारा (मंगेश कराळे) - वसईतील काही गर्भश्रीमंत व अय्याश घटकांसाठी सोईचे ठरणारे बार रात्री आ. स्नेहा दुबे यांनी स्वत: भेटी देऊन बंद केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्त्यांच्या पाहणीसाठी बाहेर पडलेल्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी मध्यरात्री बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दोन बारवर धडक कारवाई केली. रविवारी, २४ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे २.३५ च्या सुमारास वसईतील दत्ताणी मॉल परिसराची पाहणी करताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

अधिक माहिती नुसार, दत्ताणी मॉलमधील विंग्स ऑन फायर आणि पंखा फास्ट हे दोन बार निर्धारित वेळेनंतरही सुरू होते. या ठिकाणी मोठा आवाजात डीजे वाजवला जात होता. एवढंच नाही, तर मॉलबाहेर मद्यधुंद तरुण भांडणं करत असल्याचेही दिसून आले. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही मध्यरात्री २.३० नंतरही हे बार खुले असल्याचे पाहून आमदार दुबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदारांनी तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बार मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

या कारवाईनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, “आमचा कोणत्याही वैध व्यवसायाला विरोध नाही, पण कायद्याचे उल्लंघन करून रात्री २.३० नंतर सुरू असलेल्या बारवर कठोर कारवाई केली जाईल. यापुढेही आमची ही भूमिका ठाम राहील.” या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांवर जरब बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अश्या स्वरूपाच्या बार मधे महसूल, महापालिकेमधील कर्मचारीही सामिल असतात. अंडर टेबल लाखो रुपये कमवणारे अवैध कमवलेली माया याच ठिकाणी उडवतात. धाड पडल्यावर तब्बल अर्धा तास दरवाजे न उघडल्याने गोंधळाचा फायदा घेत ही मंडळी गायब झाल्याची वंदता आहे. तसेच या बार बाहेर उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी कोकणे व बेलकर हे बराच काळ जणू या बारच्या समर्थनार्थ उपस्थित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचीही उत्तरपुजा आमदारांनी बांधली होती. यावर चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.