चारवर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 08:24 IST2024-04-16T08:24:41+5:302024-04-16T08:24:58+5:30
मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार नंतर लक्षात आला.

चारवर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : नवघर पोलिस ठाणे हद्दीत चारवर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४५ वर्षीय आरोपीला ठाणे न्यायालयाने सोमवारी २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे, तर रविवारी रात्री दुकाने फोडणाऱ्या व मारहाण करणाऱ्या २० ते २५ समाजकंटकांविरुद्ध नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मीरा रोड भागात राहणारी चिमुरडी नेहमीप्रमाणे एका दुकानात गेली असता, दुकानदाराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार नंतर लक्षात आला. रविवारी जमावाने आरोपीच्या दुकानाची तोडफोड करून त्यास मारहाण करत नवघर पोलिस ठाण्यात आणले होते. पोलिसांनी पोक्सो, बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करीत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज कोळी तपास करीत आहेत. शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी शांतता राखण्यासह सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.