पालघर जि.प.तील ५ ज्येष्ठांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:06 AM2018-06-06T03:06:22+5:302018-06-06T03:06:22+5:30

जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांची बदली पुणे येथील प्रशिक्षण संस्थेत प्राचार्यपदी झाली असून त्यांच्या जागी ठाण्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी हे आले आहेत.

 5 senior colleagues from Palghar district | पालघर जि.प.तील ५ ज्येष्ठांच्या बदल्या

पालघर जि.प.तील ५ ज्येष्ठांच्या बदल्या

Next

पालघर : जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांची बदली पुणे येथील प्रशिक्षण संस्थेत प्राचार्यपदी झाली असून त्यांच्या जागी ठाण्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी हे आले आहेत.जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या जागी जिल्ह्यात कार्यरत असलेले माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आले असून भागवत यांची बदली ठाणे शिक्षणाधिकारीपदी झालेली आहे तर पालघरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी ठाण्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर-यादव यांची नियुक्ती झाली आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी .ओ.चव्हाण यांची बदली शहापूरच्या गट विकास अधिकारीपदी (प्रमोशन की डीमोशन) करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे लेखा वित्त अधिकारी संजय पतंगे यांची बदली वित्तीय नियंत्रण,नगर परिषद प्रशासन संचानालय मुंबई येथे लेखा व वित्तीय अधिकारीपदी झाली आहे.
अलीकडेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालकपदाची अतिरिक्त सूत्रे सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांच्यावर परिचर घोटाळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश असल्याने लवकरच त्यांची बदली होणार असल्याचे कळते.

Web Title:  5 senior colleagues from Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Transferबदली