24 absconding accused arrested in Gadchinchle sadhu murder case | गडचिंचले साधू हत्याकांडप्रकरणी २४ फरार आरोपींना अटक

गडचिंचले साधू हत्याकांडप्रकरणी २४ फरार आरोपींना अटक

कासा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे जमावाकडून झालेल्या साधू हत्याप्रकरणी सीआयडीने आणखी २४ फरार आरोपींना बुधवारी अटक केली असून गुरुवारी त्यांना डहाणू कोर्टात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींनी ४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले येथे १६ एप्रिल रोजी रात्री चोर समजून जमावणे दोन साधू व त्यांचा चालक यांची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात यापूर्वी अकरा अल्पवयीन आरोपींसह १६५ जणांना आरोपी केले होते. त्यापैकी ९ अल्पवयीन आरोपी व २८ आरोपींना आरोपपत्र दाखल न झाल्याने जामीन झाला होता. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात १५२ आरोपी सध्या अटकेत असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणी कर्तव्यात कसूर केली म्हणून दोन पोलीस अधिकारी व १६ पोलीस कर्मचारी यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांनी कारवाई केली होती.
 

Web Title: 24 absconding accused arrested in Gadchinchle sadhu murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.