शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी घेतली एड्सच्या समूळ निर्मूलनाची शपथ

By admin | Updated: August 13, 2015 02:51 IST

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत नोबल शिक्षण संस्थ, जय विकास माध्यमिक विद्यालय, काजळसरा व ग्रामीण रुग्णालय, ....

वर्धा : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था अंतर्गत नोबल शिक्षण संस्थ, जय विकास माध्यमिक विद्यालय, काजळसरा व ग्रामीण रुग्णालय, भिडी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दिनानिमित्त जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. गावागावात जाऊन एड्स या आजाराबाबत जागृती करून त्यांना उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश खोडे होते. लिंक वर्कर कार्यक्रम अधिकारी सुचिता बोभाटे, समुपदेशक विजय ओझा, सहाय्यक शिक्षिका रेखा आंबटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. समुपदेशक विजय ओझा यांनी मार्गदर्शनामध्ये सांगितले क, सकारात्मक विचारधारणा, युवाशक्तीचे महत्व, एच.आय.व्ही. एड्स हा आजार कशामुळे होतो, काय काळजी घेतल्यास होत नाही, एच.आय.व्ही.ची चाचणी, ग्रामीण रुग्णालय, सामान्य रुग्णालयामध्ये मोफत करून देण्यात येते, त्याचा अहवाल गोपनीय ठेवण्यात येतो, याकरीता प्रत्येकाने एच.आय.व्ही. ची चाचणी करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी केले. तर सुचिता बोभाटे यांनी युवक-युवतीमधील शारीरिक व मानसिक बदल याची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित युवकआंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देऊन त्यांच्या मनातील शंका-कुशंकाचे निराकरण केले. युवाशक्तीची आरोग्य क्षेत्रात जनजागृती करिता गरज आहे. समाजात एच.आय.व्ही व एड्सबाबत जागृतीची गरज आहे. आजाराबाबत असलेले संभ्रम कमी होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या म्हैसकर यांनी केले. संचालन गणेश पोटे यांनी केले. आयईसी माहिती पुस्तीका विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थींनी व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)