‘तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरिचा़़़’ने रसिक मंत्रमुग्ध

By Admin | Updated: December 6, 2014 22:54 IST2014-12-06T22:54:56+5:302014-12-06T22:54:56+5:30

‘तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरिचा़़़’ या नितीन वाघ यांनी सादर केलेल्या मधूर मराठी गीताने रसिकांना मंत्रमुग्ध करीत दाद मिळविली़ निमित्त होते, ‘रंग सप्तसुरांचे’ या गीत-गझल मैफलीचे! सत्यनारायण बजाज

'You are my wife, you breathe in the breath', the charming spellbinding | ‘तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरिचा़़़’ने रसिक मंत्रमुग्ध

‘तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरिचा़़़’ने रसिक मंत्रमुग्ध

वर्धा : ‘तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरिचा़़़’ या नितीन वाघ यांनी सादर केलेल्या मधूर मराठी गीताने रसिकांना मंत्रमुग्ध करीत दाद मिळविली़ निमित्त होते, ‘रंग सप्तसुरांचे’ या गीत-गझल मैफलीचे! सत्यनारायण बजाज जिल्हा ग्रंथालय व आरोही संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या गीत-गझल मैफलीचे आयोजन करण्यात आले़
मैफलीच्या अध्यक्षस्थानी जयंत मादुस्कर तर अतिथी म्हणून ग्रंथालयाचे सचिव गौरीशंकर टिबडीवाल, सहसचिव दिलीप कठाणे उपस्थित होते़ याप्रसंगी वर्ध्यातील ख्यातनाम गायिका अनघा रानडे यांचा सत्कार करण्यात आला़ गीत गझल कार्यक्रमात अजय हेडाऊ यांच्या संयोजनात नितीन वाघ व शुभांगी धोंगडी यांनी तेजोमय ‘नादब्रह्म’ या गीताने कार्यक्रमाची सुरेल सुरूवात केली़ यानंतर नितीन वाघ यांनी तू सप्तसूर माझे, ये कौन आ गयी, सुजाता जोशी यांनी आओ हुजुर तुमको, फिर छिडी रात, मनवा लागे, अरूंधती काळे यांनी इस मोड पे जाते है, तुमको पिया, इशक सुफियाना, शुभांगी धोंगडी यांनी दिल की गिरह, तेरी आखो के सिवा, स्वामिनी सुभेदार हिने मला वेड लागले, उगवली शुक्राची चांदणी, निगाहे मिलाने को, अर्चना तारणेकर यांनी इशारो इशारो में, यु सजा चाँद तर स्मीता सुभेदार यांनी दिस चार झाले मन व मी रात टाकली ही गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले़
या सुरेल मैफलीला श्याम सरोदे, विठ्ठल दानव, राजेंद्र झाडे, प्रशांत उमरे, बंटी चहांदे, बसंत भट यांनी अनुरूप वाद्यसंगत केली़ संचालन मनीषा साळवे यांनी केले तर आभार अर्चना तारणेकर यांनी मानले़ मैफलीचे निवेदन सुजाता जोशी व अरूंधती काळे यांनी केले़(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 'You are my wife, you breathe in the breath', the charming spellbinding