शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादात रखडले स्मशानभूमी सौंदर्यीकरणाचे काम

By admin | Updated: October 4, 2014 23:30 IST

स्थानिक पंचधारा स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरण कामास पालिकेने प्रारंभ केला़ सदर काम प्रगतिपथावर असताना दारूगोळा भांडाराने त्या जागेवर आपला हक्क सांगत काम बंद पाडले. मालकीची जागा नसताना

किरण उपाध्ये - पुलगावस्थानिक पंचधारा स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरण कामास पालिकेने प्रारंभ केला़ सदर काम प्रगतिपथावर असताना दारूगोळा भांडाराने त्या जागेवर आपला हक्क सांगत काम बंद पाडले. मालकीची जागा नसताना सौंदर्यीकरण प्रस्ताव पालिकेने कसा पाठविला, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ यात २ कोटी ५० लाख रुपयांचे काम मात्र रखडले आहे़वर्धा नदीवरील पंचधारा येथील स्मशानभूमीत गत अनेक वर्षांपासून शहरातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात़ पालिकेने येथे शेड बांधले व लोकांना बसण्याची व्यवस्था करून दिली़ नदीकाठावरील ऐतिहासिक पुरातन मंदिरात बसून नागरिक अंत्यविधी व अस्थी विसर्जनानंतरचे सोपस्कार पार पाडत होते; पण काही वर्षांपासून या मंदिरावर काही लोकांनी बेकायदा कब्जा केला होता. यामुळे नागरिकांना ऊन्ह, पाऊस, वारा आदींचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐतिहासिक वास्तूवर संस्था स्थापन करून कब्जा करता येतो काय, असा प्रश्न समोर आला; पण पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले़वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रेतावर अंत्यसंस्काराकरिता शेड कमी पडत होते़ शिवाय नागरिकांना बसण्यासाठी पूरेशी व्यवस्था नव्हती. यासाठी पालिकेने स्मशानभूमी विकास व सौंदर्यीकरणाची मागणी केली़ ही मागणी मंजूर करीत शासनाने अडीच कोटींचा निधी मंजूर केला़ पंचधारा स्मशानभूमीची जागा कुणाच्या मालकीची, याची चौकशी न करता कामास प्रारंभ करण्यात आला़ येथे कुंपण भिंत, दोन्ही बाजूस गेट, भिंत, शेडचे काम सुरू असताना सिएडी कॅम्प प्रशासनाने या जमिनीवर हक्क सांगत सदर बांधकाम बंद पाडले़ या प्रकारामुळे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे़ आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़