शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याकरिता महिलांचा एल्गार

By admin | Updated: September 27, 2014 02:06 IST

सावंगी (मेघे) येथील चैतन्य नगरी येथील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे.

वर्धा : सावंगी (मेघे) येथील चैतन्य नगरी येथील नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर या परिसरातील महिलांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना या गैरसोयीचा जाब विचारला. तसेच पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन्नाचा इशारा दिला. यावेळी महिलांनी मुख्य अभियंत्याला निवेदन सादर केले. या भागातील नागरिकांना गत पाच-सहा दिवसांपासून केवळ दोन गुंड भरेल इतकेच पाणी मिळत आहे. पाणीपुरवठा योग्य होईल या आशेने महिला शेजाऱ्याकडून पाणी आणून गरजा भागवत होत्या. परंतु आठवडा उलटुनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. तसेच प्रत्यक्ष भेट घेवून रजिस्टरमध्ये तक्रार नोंदविण्यात आली. परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांनी यालाही केराची टोपली दिली. सलग आठ दिवस नागरिकांनी पाण्याकरिता त्रास सोसला. अखेर महिलांचा संताप अनावर होऊन त्यांनी जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन कार्यालय, वैकुंठ मार्ग येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन समस्या कधी सोडविणार याची विचारणा केली. पाणी पुरवठा अधिकारी बाराहाते यांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्राधान्याने पाणीपुरवठा पुरेसा करणे, नळाला लावलेल्या मोटारीवर नियंत्रण आणणे, नळ सोडणाऱ्यांकडून होणारा पक्षपात थांबविणे, पाण्याचे देयक भरण्यासाठी ग्रा.पं. सावंगी कार्यालयात मासिक पाच दिवस उपलब्ध करुन देणे आदी मागण्यांवर चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनिषा गणवीर, वनमाला खैरकार, उज्वला नारळवार, उषा वागदे, मिना वासेकर, रजनी सोनपितळे, अर्चना भगत, चंदा थुल, रंजना गोटे, संध्या कांबळे, कर्तव्य सोनपितळे, सतिश नारळवार, अनिल सोनपितळे उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)