शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

बोर जंगलात गवा कधी येणार? तीन वर्षांपासून प्रस्ताव रखडलेला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:50 IST

Vardha : हस्तांतरणाचा प्रस्ताव धूळखात, तांत्रिक अडचणींचा अडसर

चेतन बेलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. अभयारण्यात वाघांसह, बिबट, अस्वल, सांबरसह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. या जंगलात भारतीय बायसन (रानगवा) आणण्यासाठी वनविभागाकडून हालचालींना वेग देण्यात आला होता. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, गत तीन वर्षापासून हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

वनविभागाने जिल्ह्याच्या बोर जंगलात बायसन आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. २०२२ मध्ये यासंदर्भात पेंचला पत्र पाठविले होते. पेंचमध्ये गव्यांची संख्या स्थिर असल्याने बोर जंगलात सांबरच्या बदल्यात गवा आणण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, विविध प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींमुळे ही देवाण-घेवाण रखडली आहे.

पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीवप्रेमींच्या मते, बोर जंगलात गव्यांची कायमस्वरूपी उपस्थिती राहिल्यास वाघ व इतर भक्षक प्राण्यांसाठी संतुलित अन्नसाखळी निर्माण होऊ शकते. यामुळे जैवविविधतेस चालना मिळेल आणि परिसंस्थेला अधिक स्थैर्य लाभेल. भारताच्या सर्वात लहान व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असलेला बोर प्रकल्प, पेंच, ताडोबा आणि मेळघाट या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांशी धोरणात्मकदृष्ट्या जोडलेला आहे. अशा परिस्थितीत, बायसनच्या आगमनामुळे हा परिसर अधिक समृद्ध होऊ शकतो. आता वनविभाग या दिशेने ठोस पावले कधी उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तीन वर्षापूर्वी दिला होता प्रस्तावबोर अभयारण्यातून पेंच अभयारण्यात सांबर पाठवून त्या बदल्यात बायसन आणण्यासाठीचा प्रस्ताव २०२२ मध्ये पाठविण्यात आला. त्याचा उद्देश दोन्ही अभयारण्यांच्या पर्यावरणीय गरजा संतुलित करणे आणि वन्यजीव जैवविविधता समृद्ध करणे असा होता. मात्र, तीन वर्षे उलटूनही, पेंच व्याघ्र प्रकल्पातून बायसनचे हस्तांतरण अद्याप झाले नाही. बायसन नेमके देणार कुठून, हे स्पष्ट नव्हते. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर अद्याप निर्णय झाला नाही, अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली

टॅग्स :wardha-acवर्धा