शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

देवळीचा आठवडी बाजार नियमित सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

सोमवारी देवळी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीला नगराध्यक्ष सुचिता मडावी, जिल्हा न.प.प्रशासन अधिकारी एम.एम.शहा, तहसिलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, न.प.उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होते.

ठळक मुद्देखासदारांची आढावा बैठक : अधिकाऱ्यांना दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शुक्रवारचा नियमीत चालणारा आठवडी बाजार गेल्या दोन महिण्यापासून बंद पडला आहे. त्यामुळे लहान मोठ्या व्यवसायिकांच्या रोजी रोटी वर संक्रात आली आहे. त्यामुळे हा आठवडी बाजार शुक्रवारला नियमीत भरविण्यात यावा. तसेच दररोजची गुजरी सुद्धा याच बाजारात भरविण्यात यावी, असे निर्देश खा. रामदास तडस यांनी दिले.सोमवारी देवळी नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. आढावा बैठकीला नगराध्यक्ष सुचिता मडावी, जिल्हा न.प.प्रशासन अधिकारी एम.एम.शहा, तहसिलदार राजेश सरवदे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, न.प.उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित होते. पालिकेत नव्याने दाखल झालेल्या वेगवेगळ्या विभागातील कॅडर अधिकारी यांनी प्रशासनात चालविलेली मनमानी व कामातील अनियमीततेबाबत खासदारांनी रोष व्यक्त केला. या अधिकाºयांची विनापरवानगी गैरहजर राहण्याची प्रवृत्ती, नागरिकांसोबतची अरेरावी व कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी आदी गंभीर प्रकार उजेडात आल्याने पालिका प्रशासनाने संबधितांवर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी केली.महसुल, आरोग्य, पोलीस विभागाने आपली जबाबदारी स्वीकारून कोरोनाचे संक्रमण काळात कामाची तत्परता दाखवावी अशा सुचना खासदारांनी केल्या. देवळीतील सर्व भागात दारूचा महापूर आला आहे. व्यवसायातील स्पर्धेतून अवैद्य दारूविक्रेत्यांचे गॅगवार होवू पाहत आहे. काही पोलीस शिपायांचे हात यात गुंतले असल्याचे बोलले जात असल्याने याची वेळीच दखल घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिले. काही कारण नसतांना न.प.चे कामचुकार अधिकारी व कर्मचारी रजेवर जात असेल तर अशांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यासोबतच त्यांचे वेतन थांबवून वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात यावी. तसेच निर्जंतुकीकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ठरविण्यात आलेल्या रविवार ऐवजी गुरूवारी मोहिम राबविण्यात यावी.रविवार हा दिवस व्यवसायाचा असल्याने दिवसाबाबतची दुरूस्ती करण्यात यावी अशा सुचना खा.तडस यांनी बैठकीत दिल्या. पालिका अधिकाºयांची चांगली झाडाझडती घेतली.