शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

येळाकेळीच्या ‘उन्नई’ची पाणी साठवण क्षमता घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

येळाकेळी येथील उन्नई बंधाºयातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी या प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांमध्ये यंदा पाणी समस्या निर्माण होणार नाही असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देगाळाचा फटका : वर्धा नगरपालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे चुकतेय नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी येळाकेळी येथील उन्नई बंधारा येथे अडविल्या जाते. त्यानंतर तेथून उचल करण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील नागरिकांना केला जातो. असे असले तरी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने उन्नई बंधाऱ्याची पाणी सावठण क्षमताच कमी झाली आहे. या बंधाºयाला गाळमुक्त करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.येळाकेळी येथील उन्नई बंधाऱ्यातून उचल करण्यात आलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील सुमारे १८ हजार कुटुंबीयांना केल्या जातो. सध्यास्थितीत महाकाळीच्या धाम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला ५ दलघमी पाणी या प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांमध्ये यंदा पाणी समस्या निर्माण होणार नाही असे पाटबंधारे विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. परंतु, ज्या उन्नई बंधाऱ्यातून वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याची उचल करते. त्याच बंधाऱ्यात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमताच कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उचल संस्था असलेल्या वर्धा नगरपालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणी पुरवठ्याचे नियोजनच चूकत आहे.येळाकेळी येथील उन्नई बंधाऱ्यातील गाळवेळीच न काढल्यास वर्धा शहरासह परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरणी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. यासाठी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.पालिकेकडून पत्रव्यवहार; पण कार्यवाही शून्ययेळाकेळी येथील उन्नई बंधारा गाळमुक्त व्हावा या हेतूने वर्धा नगर पालिकेने वर्धा पाटबंधारा विभागाकडे पत्र व्यवहार केले. परंतु, पाटबंधारे विभागातील काही अधिकारी हा विषय मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड वर्धा नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे वर्धा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.वर्षाला देतेय ५० लाखधाम प्रकल्पातून सोडण्यात आलेले आणि उन्नई बंधारा येथून उचल करण्यात आलेल्या पाण्याचा मोबदला म्हणून वर्धा नगरपालिका प्रशासन वर्धा पाटबंधारे विभागाला वर्षाला सुमारे ५० लाख रुपयांचा मोेबदला देते. परंतु, उन्नई बंधाऱ्यातून गाळ काढण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी