शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी उपविभागातील २३ बारमाही वनमजुरांना कायम होण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: February 1, 2015 23:02 IST

वन विभागातील बारमाही वनमजुरांना वनविभागात सेवेत नियमीत करण्याचा शासनाचा आदेश आहे. असे असतांनाही उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन वनपरिक्षेत्रातील

आर्वी : वन विभागातील बारमाही वनमजुरांना वनविभागात सेवेत नियमीत करण्याचा शासनाचा आदेश आहे. असे असतांनाही उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा या तीन वनपरिक्षेत्रातील बारमाही वनमजुरांना शासनाच्या तुघलकी धोरणाचा फटका सहन करावा लागत आहे. गत दोन वर्षांपासून त्यांना सेवेत सामावून घेतले नसल्याने त्यांची प्रतीक्षा अद्याप कामय आहे. २०१२ साली बारमाही वनमजुरांची सेवा ज्येष्ठता यादी उपवनसंरक्षक वर्धा यांनी विभागीय स्तरावर पाठविली. यात आर्वी वनपरिक्षेत्रातील पाच, आष्टी १७ व कारंजा तालुक्यातील एक या बारमाही वनमजुरांची सेवाज्येष्ठता यादी कायम न करता त्याच कालावधीत व वनमजूर लागलेल्या इतर अपात्र कामगारांना कायम करण्यात आल्याचा आरोप होत आहे. एकच सेवाज्येष्ठता यादी, एकाचवेळी काम केलेले कर्मचारी असून आर्वी उपविभागातील २३ बारमाही वनमजुरावर अन्याय झाल्याचा आरोपही होत आहे. यावर तातडीने कार्यवाही करून वनमजुरांना कायम करण्याची मागणी होत आहे. याविरूध्द आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यात महसूल व वनविभाग शासन पत्र क्रं. २०१३/प्र.क्र. ३३४, मुंबई तसेच अप्पर प्रधान, मुख्य वनसंरक्षक यांच्या शासन परिपत्रकानुसार कार्यालयात अधिनस्थ असलेले बारमाही वनमजूर कायम होण्यापासून वगळल्या जाणार नाही असा शासन निर्णय आहे. असे असताना या वनमजुरांना कायम होण्यासाठी उंबरठे झिजवावे लागत आहे. या वनमजुरांना कायम करण्याची घोषणा तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली होती. यावर अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)