विठ्ठल चरणी भाविक नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:39 PM2018-07-23T22:39:50+5:302018-07-23T22:40:07+5:30

आषाढी एकादशीचे औचित्य साधून वर्धा शहरासह परिसरातील भाविकांनी सोमवारी विठ्ठलाच्या चरणी माथा टेकविला. स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पहाटे ५ वाजतापासूनच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

Vitthal Charai Bhavik Parmeshak | विठ्ठल चरणी भाविक नतमस्तक

विठ्ठल चरणी भाविक नतमस्तक

Next
ठळक मुद्देफुलला भाविकांचा मळा : मंदिरासमोर दिवसभर दर्शनार्थ्यांची कायम होती रिध

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आषाढी एकादशीचे औचित्य साधून वर्धा शहरासह परिसरातील भाविकांनी सोमवारी विठ्ठलाच्या चरणी माथा टेकविला. स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पहाटे ५ वाजतापासूनच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
सोमवारी पहाटे ५ वाजता आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंदिरात महाअभिषेक पार पडला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याची द्वार विठ्ठल-रुख्मिनीच्या दर्शनासाठी भाविकांकरिता उघडी करण्यात आली होती. भाविकांनीही थांबून थांबून सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता ‘अमृताहूनी गोड विठ्ठल नामाची ओढ’ असे काहीसे म्हणत विठ्ठला चरणी आपला माथा टेकविला.
लांबच लांब रांगेत दर्शनासाठी तासन्तास उभे असलेले भाविक विठ्ठल नामाचा जयघोष करीत एक-एक पाऊल पुढे टाकत होते. सायंकाळी उशीरापर्यंत मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम होती. दुपारपेक्षा सायंकाळी दर्शनासाठी अधिकच गर्दी केली होती. मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री ७ वाजता हरिपाठ तर ८ वाजता हरि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविक उपस्थित होते.

Web Title: Vitthal Charai Bhavik Parmeshak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.