शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांबाबत व्यक्त केली ग्रामस्थांनी नाराजी

By admin | Updated: August 18, 2014 23:39 IST

शासनाच्या नियमानुसार स्थानिक ग्रा़पं़ची ग्रामसभा स्वातंत्र्यदिनी सरपंच रवींद्र बरिये यांच्या अध्यक्षतेत पार पडली़ सभेत ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली़ यावेळी

रोहणा : शासनाच्या नियमानुसार स्थानिक ग्रा़पं़ची ग्रामसभा स्वातंत्र्यदिनी सरपंच रवींद्र बरिये यांच्या अध्यक्षतेत पार पडली़ सभेत ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली़ यावेळी संरक्षण भिंतीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला़काही ग्रा़पं़ सदस्य मासिक सभा तथा ग्रामसभेला नेहमी गैरहजर असतात़ त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, याबाबत विजय राऊत यांनी ठराव मांडला़ त्यास ग्रामसभेने मंजुरी दिली़ ग्रामविकास अधिकारी परांजपे यांनी समाज कल्याण विभागाच्या काही व्यक्तीगत लाभाच्या योजना तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करावयाच्या कामांची माहिती दिली़ गावातील रस्त्यावर जनावरे बांधणे, रस्त्याच्या बाजूला शेण व कचऱ्याचे ढिगारे लावणे, अतिक्रमण, कोंडवाडा नसणे, रस्त्यावर भरणारा मटण व मच्छी बाजार, रेल्वे पुलाखालील रस्त्यावर पडलेला खड्डा, गांधी वॉर्डाकडील स्मशानभूमीतील असुविधा, शौचालय बांधकामातील तांत्रिक कारणे पुढे करून दिला जाणारा त्रास, पथदिवे बंद असणे, चोरांबा पांदण रस्त्याचे काम रखडल्याने होणारा त्रास याबाबत तरूणांनी सभेत चर्चा घडवून आणली़ यावेळी गावातील पाणीटंचाई, १५-१५ दिवस नळ न येणे, नळ सोडण्यातील अनियमितता, पाण्याचा गैरवापर मार्डा येथून आलेली कालबाह्य ठरलेल्या पाईपलाईनच्या तात्पुरत्या दुरूस्तीवर होणारा खर्च यावर वादळी चर्चा झाली़ पाणी समस्या निवारण्यासाठी गाव राष्ट्रीय पेय जल योजनेत समाविष्ट झाले आहे़ ही योजना गावात कार्यान्वित झाल्यास हा प्रश्न सुटेल, असा आशावाद सरपंच, उपसरपंच व सचिव यांनी व्यक्त केला़ ग्रामसभेत ग्रा़पं़ किती दिवस नळ सोडते, या हिशेबाने पाणी पट्टी कर कमी करावा, याबाबत तरूण आग्रही होते़ उपसरपंच सुनील वाघ यांनी नदी खोलीकरणाचा निधी परत गेल्याने बांधकाम विभागातील प्रशासनावर नाराजी व्यक्त केली़ नदीवरील पुलाची उंची वाढविणे, संरक्षण भिंत बांधणे यासाठी नव्याने प्रस्ताव पाठवावा लागेल, असे सांगितले़ आभार परांजपे यांनी मानले़(वार्ताहर)