शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यावरच भरतो भाजी बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

कचऱ्याचे येथील अवस्था पाहता भाजी बाजार कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर भरतो की काय, असा उपरोधिक सवाल नागरिकांतून केला जात असून बाजार समिती प्रशासनाच्या जाणिवा मात्र, बोथट झाल्या आहेत. महात्मा फुले भाजी मार्केट असे नाव असलेला शहरातील मुख्य भाजी बाजार बजाज चौक परिसरात रेल्वेस्थानक मार्गालगत आहे. बाजारात शेकडोवर भाजी आणि फळ विक्रेते आहेत. मात्र, बाजार सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे.

ठळक मुद्देनागरिकांचा गुदमरतोय श्वास : बाजार समिती प्रशासनाची नियोजनशून्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य भाजी बाजारासह परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला असून सोईसुविधांचाही प्रचंड दुष्काळ आहे. परिणामी, व्यावसायिकांसह ग्राहकांचा श्वास येथे गुदमरत असून आरोग्याविषयी प्रश्न उपस्थित झाला आहे.कचऱ्याचे येथील अवस्था पाहता भाजी बाजार कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर भरतो की काय, असा उपरोधिक सवाल नागरिकांतून केला जात असून बाजार समिती प्रशासनाच्या जाणिवा मात्र, बोथट झाल्या आहेत. महात्मा फुले भाजी मार्केट असे नाव असलेला शहरातील मुख्य भाजी बाजार बजाज चौक परिसरात रेल्वेस्थानक मार्गालगत आहे. बाजारात शेकडोवर भाजी आणि फळ विक्रेते आहेत. मात्र, बाजार सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे.भाजी-फळविक्रेत्यांना बसण्यास ओटेही नसून शौचालय व इतर मूलभूत सुविधा नाहीत. दररोज निघणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याकरिता कुठलीही सोय नसल्याने व्यावसायिक भाजी बाजाराच्या भिंतीलगत रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गालगत आणि बाजाराच्या मागील खुल्या जागेवर सडका भाजीपाला फळे व इतर प्रकारचा कचरा टाकतात. यावर मोकाट जनावरे उच्छाद घालताना दिसतात.हा कचरा कुजून परिसरात मोठी दुर्गंधी पसरलेली असते. मागील अनेक दिवसांपासून ही समस्या आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर ग्राहकांना भाजी बाजारात पायदेखील ठेवता येत नाही, अशी अवस्था असते.बाजार समिती प्रशासन केवळ चुरी टाकून भाजी विक्रेत्यांची बोळवण करताना दिसते. वर्ष-दोन वर्षांपूर्वी वर्धा बाजार समिती प्रशासनाने भाजी बाजाराचे सौंदर्यीकरण करण्याचे व्यावसायिकांना पोकळ आश्वासन दिले. दोन वर्षांत ना ओट्यांची उभारणी झाली ना सौंदर्यीकरण. यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत समस्या सोडवाव्या, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.उघडे चेंबर ठरतेय जीवघेणेसौंदर्यीकरणाअंतर्गत मुख्य भाजी बाजारात ओट्यांचे बांधकाम व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. मात्र, दोन वर्षे लोटूनही सौंदर्यीकरणाचा बाजार समिती प्रशासनाला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे बाजाराची अवस्था बकाल असल्याचे विशाल तिवारी यांनी सांगितले.भाजी बाजार परिसरात रेल्वेस्थानकाकडे जाणाºया मार्गावर मुडके बुक स्टॉलसमोर भूमिगत गटार योजनेकरिता चेंबर तयार करण्यात आले. कित्येक दिवसांपासून हे खोल असलेले चेंबर उघडेच असून त्यावर झाकणही बसविण्यात आलेले नाही. रात्री हे उघडे चेंबर वाहनचालक आणि मोकाट जनावरांकरिता धोकादायक ठरत आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार आणि नगरपालिका कुंभकर्णी झोपेत आहे. एखाद्याच्या बळी गेल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल व्यावसायिक करीत आहेत.