शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

श्वान दंशापोटी एका दिवसात दहा जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळलेल्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देबेवारस श्वानांचा मुद्दा ऐरणीवर । नगर पालिका प्रशासन सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मागील वर्षभरापासून भटक्या श्वानांनी नागरिकांना वेठीस धरल्याचे चित्र आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल जणांना श्वानदंश झाला. मात्र, नगरपालिकेसह संबंधित यंत्रणेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहे.शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळलेल्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.विद्यार्थ्यांसह मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मोकाट श्वानांचा त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट श्वान, वराह यांचा जन्मदर नियंत्रित करण्याबाबतची बाब स्वच्छता करात अंतर्भूत आहे. मात्र, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून याला पद्धतशीर बगल दिली जात आहे. मोकाट श्वानांचा जन्मदर नियंत्रित करण्याविषयी पीपल फॉर अ‍ॅनिमल्सचे सचिव आशीष गोस्वामी यांनी मोकाट श्वानांसह स्वत:ला पिंजऱ्यात कोंडून घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन केले. याला महिना लोटला मात्र जिल्हा प्रशासनाकडून कारवाई शून्य आहे. कारवाईची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहे. याचाच परिणाम मोकाट श्वानांचा शहरात हैदोस कायम आहे. शुक्रवारी शहरात तब्बल जणांना मोकाट श्वानांनी चावा घेतला.जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना लसीकरणही करण्यात आली. मात्र, नगरपालिका, जिल्हा प्रशासन सुस्त आहे. स्वच्छतेत श्वानांच्या जन्मदराची बाब अंतर्भूत असताना नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात मिळविलेला क्रमांक बोगसगिरी असल्याच्या संतप्त प्रतिक्रियाही वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत. पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.मोकाट श्वानांचा मानवी वस्तीतील वावर घातकमोकाट श्वानांना सदैव निरनिराळ्या आजारांची लागण होते. त्यामुळे मानवावरही याचा परिणाम होतो. अनेकांना कोरड्या खोकल्याचा आजार बळावतो. याशिवाय संसर्गजन्य व अन्य जीवघेणे आजार उद्भवतात. मात्र, यंत्रणा या प्रश्नी गंभीर नाही. बेवारस श्वानांची बाब स्वच्छतेत अंतर्भूत असताना दुर्लक्ष करण्यात येते. नागरिकांकडून करवसुली मात्र केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.वराहांच्या वाढत्या जन्मदराकडेही दुर्लक्षशहरातच नव्हे तर लगतच्या ग्रामीण भागात वराहांचीही मागील काही वर्षांत प्रचंड संख्या वाढली आहे. यामुळे घाणीच्या साम्राज्यात भर पडत आहे. वराह अनेकवार थेट घरात शिरतात. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मात्र, वराहांचादेखील संबंधितांकडून बंदोबस्त को जात नाही.

टॅग्स :dogकुत्रा