शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दोघजण जागीच ठार, एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 5:14 PM

Accident : वायगाव गोंड रस्त्यावरील घटना

ठळक मुद्देप्रदीप कुंभारे रा. हिवरा आणि सतीश भोयर रा. वायगाव गोंड असे मृतकाचे नाव आहे.

समुद्रपूर ( वर्धा):समुद्रपूर -वायगाव गोंड  मार्गांवर दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघजण जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवारी  सकाळी 11.30 वाजता घडली. तर दुचाकी चालकाचा सहकारी यात जखमी झाला आहे. प्रदीप कुंभारे रा. हिवरा आणि सतीश भोयर रा. वायगाव गोंड असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार एम एच 32 ए डी 1568 क्रमांकाच्या दुचाकीने सतीश भोयर (40 )वर्ष हा वायगाव गोंड वरून समुद्रपूरकडे येत होता. तर हिवरा येथील प्रदीप कुंभारे ( 40)आणि सहकारी शुभम बहादूरे हे दोघे एम एच 32सी झेड 2774 क्रमांकाच्या दुचाकीने समुद्रपूर वरून  अंतसंस्काराचे साहित्य खरेदी करून राळेगाव मार्ग हिवऱ्याला जातं होते.

दरम्यान वायगाव गोंड रस्त्यावर गायकवाड यांच्या शेताजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात सतीश भोयर आणि प्रदीप कुंभारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप कुंभारे यांचा सहकारी शुभम बहादुरे जबर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक अपेक्षा मैश्राम, पोलीस कर्मचारी सिरसाट घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूtwo wheelerटू व्हीलर