शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

जुगारात हरलेली रक्कम फेडण्यासाठी अवलंबिला दोघांनी लुटमारीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

पोलीस शिपाई अजय अनंतवार हे महाराष्ट्र बँकेलगतच्या टपरीवर चहा पीत असताना त्यांना लुटपाट प्रकरणातील एक चोरटा निदर्शनास आला. अजय अनंतवार यांनी त्यास आवाज देत त्यांनी जवळ बोलाविले. पण, त्यांचा बेत हेरून त्याने दुचाकीने पळविली. अजय अनंतवार यांनी दुचाकीने त्याचा ५०० मीटर अंतरापर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यास पकडले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुलीही दिली.

ठळक मुद्देचोरट्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी : दुचाकीसह दीड लाखांची रक्कम केली हस्तगत, आणखी गुन्हे येणार उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवृत्त वयोवृद्धांना हेरून त्यांच्याकडील रक्कम लुटून नेणाऱ्या दोन चोरट्यांना रामनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या दोघांनाही जुगार खेळण्याचा नाद असून, जुगारात झालेले कर्ज फेडण्यासाठी ते वृद्धांकडून रक्कम हिसकत असल्याचे पुढे आले आहे. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. रामनगर पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि अंदाजे दीड लाख रुपयांची रक्कमही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलिसांनी अटक केलेले नीलेश गिरडकर आणि चंद्रकांत काटकर हे एकुर्ली येथील रहिवासी आहेत. दोघांनाही जुगार खेळण्याचे व्यसन जडले होते. जुगार खेळण्यासाठी त्यांनी कर्जही घेतले होते. जुगारात ही रक्कम हरल्याने कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न त्यांनी निवृत्ती वेतनधारक वृद्धांना लुटण्याचा डाव आखून सोडविला. दोघांनीही अनेक दिवस वर्ध्यातील विविध बँकांमध्ये जाऊन तेथील सुरक्षा काय आहे, याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी पहिला डाव साधला. वृद्धाला लुटल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर असलेले संपूर्ण कर्ज फेडले. पण, सहज पैसे कमविण्याचा मार्ग सापडल्याने दोघांचीही हिंमत वाढली. १२ मार्च रोजी पुन्हा त्यांनी एका वृद्धाला हिंदनगर परिसरात लुटले. दोन्ही घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पोलीस सतर्क झाले होते. अखेर रामनगर पोलिसांना  चोरट्यांना गजाआड केले.

सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला चोरटा

रामनगर ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक शहरातील बँकांपुढे सापळा रचून होते. सिव्हिल ड्रेसवर पोलीस बँकेत दबा धरून बसले होते. ठाणेदार जळक यांनी एकाच बँकेऐवजी काही पोलिसांना बँक ऑफ महाराष्ट्रजवळ थांबण्यास सांगितले. पोलीस शिपाई अजय अनंतवार हे महाराष्ट्र बँकेलगतच्या टपरीवर चहा पीत असताना त्यांना लुटपाट प्रकरणातील एक चोरटा निदर्शनास आला. अजय अनंतवार यांनी त्यास आवाज देत त्यांनी जवळ बोलाविले. पण, त्यांचा बेत हेरून त्याने दुचाकीने पळविली. अजय अनंतवार यांनी दुचाकीने त्याचा ५०० मीटर अंतरापर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यास पकडले. पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुलीही दिली. ठाणेदार जळक यांना माहिती दिल्यानंतर दुसऱ्याही आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले. 

सुमारे ४० दुचाकींची केली होती तपासणी शहरात लागोपाठ वृद्धांना लुटल्याच्या घटनांनी पोलिसांवरील ताण वाढला होता. शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.ठाणेदार धनाजी जळक यांनी  कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत चोरट्यांना गजाआड करण्याच्या सूचना केल्या. कर्मचाऱ्यांनी बँकेतून प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, तब्बल ४० ते ५० दुचाकींची गोपनीय पद्धतीने तपासणी करीत चोरांना अटक करण्यात यश आले.

प्रशस्तीपत्र देऊन कर्मचाऱ्यांना दिले ‘बुस्टर’पादचारी वृद्धांना निर्जन स्थळी लुटण्याच्या दोन घटनांनी शहरात खळबळ उडली. रामनगर ठाण्यातील कर्मचारी आरोपींच्या शोधात दीड ते दोन महिन्यांपासून होते. अखेर त्यांनी दिवस-रात्र एक करीत तपास करून चोरट्यांना गजाआड केल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या हस्ते ठाणेदार धनाजी जळक आणि त्यांच्या टीमला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कर्मचाऱ्यांची कमतरता तरीही उत्कृष्ट कामगिरी रामनगर पोलीस ठाण्यात ११० पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ८३ पोलीस कर्मचारी कार्यरत असून २७ पदे अजूनही रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी चार आजाराने त्रस्त असल्याने सुटीवर आहेत, तर पाच जणांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे विविध गुन्ह्यांचा तसेच तपासाचा मोठा ताण आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

देवळी, बुटीबोरीसह इतर विविध ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता... जिल्ह्यातील देवळीसह इतर शहरात तसेच नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी गावात झालेल्या अशाच पद्धतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपींची कसून चाैकशी सुरू आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर